Palak Pare Recipe: आपल्यापैकी अनेकांना पालक आवडत असेल. अनेकदा आपण पालकाची भाजी बनवून खातो. पण जर तुम्ही पालकाची भाजी खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही पालकापासून एक हटके रेसिपी करू शकता. तुम्ही पालक पाऱ्या कधी खाल्ल्या का? हो, पालक पाऱ्या या चवीला स्वादिष्ट आणि तितक्याच पौष्टिक आहेत. आज आपण पालक पुऱ्या कशा बनवायच्या? हे जाणून घेणार आहोत.
पालक पाऱ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- २ कप चिरलेला पालक
- १ कप मैदा
- २ कप गव्हाचे पीठ
- १/२ कप बेसन
- १/२ चमचा लाल तिखट
- १/२ चमचा चाट मसाला
- ३ चमचे रवा
- १/२ चमचा जिरे
- १/२ चमचा काळी मिरी
हेही वाचा: ओट्स खायचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा ओट्सचे चविष्ट पोहे
पालक पाऱ्या बनवण्याची कृती:
- पालक पाऱ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम बारीक केलेला पालक स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- आता मैदा, गव्हाचे पीठ, बेसन, लाल तिखट, रवा, जिरे, काळी मिरी आणि पालक एकत्र करून घट्ट पीठ मळून घ्या.
- आता साधारण १५-२० मिनिट हे पीठ झाकून ठेवा.
- आता या पीठाचा गोळा बववून त्याचे शंकरपाळीप्रमाणे काप बनवा.
- दुसरीकडे गॅसवरील कढईत तेल गरम करून त्यात पालक पाऱ्या तळून घ्या.
- तयार पालक पाऱ्यांचा आस्वाद घ्या.
u