Tasty Potato Momos: मोमोज हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना सर्रास आवडतो, शिवाय हा बनवायलाही खूप सोपा आहे. तुम्ही आतापर्यंत चिकन मोमोज किंवा भाज्यांपासून तयार केलेले मोमोज खाल्ले असतील. पण, आज आम्ही तुम्हाला बटाट्याचे मोमोज कसे बनवायचे हे सांगणार आहोत. जाणून घ्या साहित्य आणि कृती…
बटाट्याचे मोमोज तयार करण्यासाठी साहित्य:
१. ३ कप मैदा
२. १ चमचा बेकिंग पावडर
३. ६ उकडलेले बटाटे
४. २ चमचे लसणाची पेस्ट
५. २ चमचे बटर
६. ३ चमचे काळी मिरी
७. चवीनुसार मीठ
बटाट्याचे मोमोज तयार करण्याची कृती:
१. सर्वप्रथम मैदा, मीठ आणि बेकिंग पावडर एकत्र करून घ्या; त्यात लागेल तसे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या.
२. आता दुसरीकडे उकडलेले बटाटे, लसणाची पेस्ट, मिरपूड आणि मीठ एकत्र मॅश करून घ्या आणि या सर्वांचे मिश्रण तयार करा.
३. त्यानंतर पीठ पातळ लाटून घ्या आणि त्याचे ५-६ गोल वाटीच्या मदतीने पाडून घ्या.
४. या गोल चकत्यांमध्ये बटाट्यांचे मिश्रण भरून सर्व मोमोज तयार करून घ्या.
हेही वाचा : नुसतं नाव ऐकून तोंडाला सुटेल पाणी, सोप्या पद्धतीने असं बनवा आंबट गोड पेरुचं लोणचं; नोट करा साहित्य आणि कृती
५. यानंतर सर्व मोमोज दहा मिनिटे वाफवून घ्या.
६. तयार गरमागरम मोमोज चटणीसोबत सर्व्ह करा.