Ragi Chips: लहान मुलं मोठ्या प्रमाणात बाजारीत चिप्स खाणं मोठ्या प्रमाणात पसंद करतात. पण सतत बाहेकचे हे चिप्स खाल्ल्याने शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. अशावेळी तुम्ही घरच्या घरी पौष्टिक नाचणीच्या पीठापासून चटपटीत चिप्स तयार करू शकता. नाचणीत कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्ये असतात. शिवाय यामुळे अशक्तपणादेखील दूर होण्यास मदत होते. शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यासदेखील नाचणीचे पदार्थ खाणं फायदेशीर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाचणीचे चिप्स बनवण्यासाठी साहित्य :

१. २ कप नाचणीचे पीठ
२. १/२ कप गव्हाचे पीठ
३. २ चमचे लाल तिखट
४. बेकिंग-ट्रे
५. चवीनुसार मीठ
६. तेल आवश्यकतेनुसार

नाचणीचे चिप्स बनवण्याची कृती:

१. सर्वात आधी एका भांड्यात नाचणी पीठ, गव्हाचे पीठ, लाल तिखट, मीठ टाका.

२. आता त्यात एक चमचा तेल टाकून पीठ मळून घ्या आणि मळलेले पीठ १०-१५ मिनिटांपर्यंत झाकून ठेवा.

३. त्यानंतर मळलेल्या पाठीचा लहान गोळे तयार करुन घ्या.

४. या गोळ्यांपासून गोलाकार चपाती तयार करा आणि चाकूच्या मदतीने त्याचे लहान आकाराचे चौकोनी काप तयार करुन घ्या.

५. एका ब्रशच्या मदतीने या कापलेल्या कापांवर तेल लावून घ्या.

६. आता, मायक्रोवेव्ह १८०अंश सेंटीग्रेडवर १० मिनिट प्री-हीट करून बेकिंग ट्रेला ग्रीस करू त्यावर कापलेले सर्व काप बेक करा.

हेही वाचा: व्हेज ऑम्लेट खायचंय? मग नक्की ट्राय करा टेस्टी ‘रवा ऑम्लेट’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

७. पहिले ७-८ मिनिटे एका बाजूने बेक करून घ्या आता मायक्रोवेव्ह उघडून दुसऱ्या बाजूने ७-८ मिनिट बेक करून घ्या.

८. वेळ पूर्ण झाल्यानंतर मायक्रोवेव्ह बंद करून ठेवा.

९. तयार नाचणी चिप्सचा आस्वाद घ्या.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Instead of market chips make homemade nutritious ragi chips for kids quickly note ingredients and recipes sap
Show comments