Janmashtami 2024 Special Recipes : कृष्ण जन्माष्टमीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रासह देशभरात या सणानिमित्त मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून येते. यात महाराष्ट्रात मोठ्या धुमधडाक्यात हा सण साजरा होतो. यंदा २६ ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाईल. या दिवशी रात्री १२ वाजता बाळकृष्णाला पाळण्यात बसवून पूजले जाईल. त्यानंतर कृष्ण जन्माष्टमीनिमित्त रात्री १२ वाजता बालगोपाळ दहीहंडी फोडून या सणाचा आनंद घेतात. इतकेच नाही तर या सणानिमित्त विविध खाद्यपदार्थ बनवले जातात. विशेषत: कोकणात कृष्ण जन्माष्टमी दिवशी आंबोळ्या आणि काळ्या वाटण्याची उसळ बनवण्याची परंपरा आहे. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी कृष्ण जन्माष्टमी निमित्त कोकणातील स्पेशल काळ्या वाटण्याची उसळ आणि आंबोळ्या घरच्या घरी कशा बनवायच्या याची सविस्तर रेसिपी घेऊन आलो आहे.

कृष्ण जन्माष्टमी स्पेशल कोकणी रेसिपी (Janmashtami 2024 Konkani Recipe)

आंबोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती (Amboli recipe)

साहित्य

Crispy Butterfly Samosa Recipe
‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
How To Make Methi Paratha
Methi Paratha Recipe : मेथीचे बनवा मऊसूत पराठे! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी बेस्ट रेसिपी
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती

जाड तांदूळ (उकडा नाही) दोन वाटय़ा, उडीद डाळ एक वाटी, चणा डाळ अर्धा वाटी, मेथी दाणे आणि जिरे अर्धा-अर्धा चमचा.

कृती

डाळी आणि तांदूळ आदल्या दिवशी सकाळी वेगवेगळे भिजत घाला. साधारण पाच ते सहा तास भिजल्यानंतर वाटून घ्या. डाळी मुलायम वाटा पण तांदूळ जरा खसखशीत ठेवा. सर्व एकत्र करून व्यवस्थित फेटून घ्या. फार घट्ट ठेवू नये. ओतण्या इतपत ठेवा. मीठ आणि किंचित साखर घालून सात-आठ तास आंबवण्यासाठी झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी अलगद सारखे करून, तव्यावर तेल घालून मध्यम आंबोळ्या काढाव्यात. फार जाड असू नयेत. कोकणी आंबोळ्या साधारण तळहातापेक्षा थोडय़ा मोठय़ा असतात. घातल्यावर झाकण ठेवा की सुरेख जाळी पडते. दोन्ही बाजूंनी लालसर शेकून खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला द्या.

काळ्या वाटाण्याचे उसळ बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती (Kalya vatanyachi Usal)

साहित्य

२ वाट्या काळे वाटाणे (रात्रभर पाण्यात भिजवलेले), मध्यम आकाराचा कांदा (भाजलेला), २ वाटी ओले खोबरे (भाजलेले), ४-५ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, ४-६ आमसुले, १ टीस्पून हळद, १ टीस्पून हिंग, २ टीस्पून मसाला, १ टीस्पून गरम मसाला, १ टीस्पून लाल मिरची पूड, १ बारीक चिरलेला कांदा, १ टोमॅटो, १ टीस्पून जिरे पूड, १ टीस्पून धणे पूड
चवीनुसार मीठ, ४- ५ दाणे काळीमिरी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरम मसाले घेऊ शकता.

कृती

आता भिजवलेले काळे वाटाणे कुकरमध्ये ६ ते ७ शिट्या काढून उकडून घ्यावेत. नंतर कांदा, खोबरे, आलं व लसूण, काळी मिरी खरपूस भाजून घ्यावे आणि थंड झाल्यावर ते मिक्सर मध्ये बारीक वाटून वाटण तयार करा. आता थोडे शिजलेले वाटाणे वेगळे काढून ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.

Read More Krishna Janmashtami 2024 News : जन्माष्टमीनंतर ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा! मंगळाच्या मिथुन राशीतील प्रवेशाने येणार सुखाचे दिवस

आता कुकरमध्ये थोडे तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात लसूण, कांदा, टोमॅटो चांगले भाजून घ्यावे. यानंतर त्यात तयार केलेले वाटण घालून छान परतून घ्यावे.नंतर त्यात हळद, हिंग, लाल मिरची पूड, धणे पूड, जिरे पूड, मसाला व गरम मसाला घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यात वाटलेले वाटाण्याचे मिश्रण घालून छान मिक्स करावे.

सर्व जिन्नस एकत्र खरपूस झाल्यानंतर त्यात उकडलेले वाटाणे घालून मिक्स करून घ्यावे. आवडीनुसार पाणी घालावे. त्यात आमसुले व चवीनुसार मीठ घालून कुकर बंद करून घ्यावा. २-३ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करावा. काळे वाटाणे चांगल्य प्रकारे उकडले असतील तर फोडणी दिल्यानंतर जास्त शिट्ट्या काढू नका.

Story img Loader