शुभा प्रभू साटम
ज्वारी थंडावा देत असल्याने उन्हाळ्यात तिचा आहारात जरूर समावेश करावा.
आणखी वाचा
साहित्य :
१ मध्यम वाटी ज्वारी, तूप, मोहरी, आले, कढिलिंब, हिंग, हळद आणि कांदा, टोमॅटो, ओले खोबरे, मीठ, साखर
कृती
ज्वारी ७-८ तास किंवा रात्रभर भिजवून ठेवावी आणि दुसऱ्या दिवशी उपसून कुकरमध्ये ४-५ शिट्टय़ा करून शिजवून घ्यावी. मऊसर शिजायला हवी. आता तुपाची फोडणी करून त्यात मोहरी, आले, कढिलिंब, हिंग, हळद घालावे. त्यात आवडीप्रमाणे कांदा, टोमॅटोही वापरता येईल. फोडणीतले जिन्नस शिजल्यावर कुकरमधून काढलेली ज्वारी निथळून घेऊन घालावी. मीठ, किंचित साखर, ओले खोबरे घालून ढवळून एक वाफ काढावी. यामध्ये ज्वारीसोबत भाज्या, डाळीसुद्धा आवडीप्रमाणे घालू शकता.