Jawas Ladoo : हिवाळा सुरु झाला आहे. सगळीकडे गारवा जाणवतोय. अशात तज्ज्ञांकडून हिवाळ्यात उष्ण पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही खरंच उष्ण पदार्थ खात आहात का? जर तुम्हाला लाडू खायला आवडत असेल तर आज आपण जवसाचे लाडू कसे बनवायचे, हे जाणून घेणार आहोत. जवस हे उष्ण असते. त्यामुळे हिवाळ्यात आवर्जून जवस खाण्याचा सल्ला दिला जातो. जवसाचे लाडू हा हिवाळ्यात आहाराच्या दृष्टीने चांगला पर्याय आहे. डिंक सुद्धा उष्ण असतात. त्यामुळे जर जवसमध्ये डिंक टाकून लाडू बनवले तर ते चवीला अधिक स्वादिष्ट वाटतात. हे जवसाचे लाडू कसे बनवावे, चला तर जाणून घेऊ या.

साहित्य :

  • जवस
  • गव्हाचे पीठ
  • डिंक
  • तूप
  • काजू
  • बदाम
  • साखर
  • गुळ

हेही वाचा : Bajra Sheera : हिवाळ्यात खा बाजरीच्या पिठाचा खमंग शिरा, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
How To Make Matar Kachori At Home Matar Kachori recipe in marathi
थंडीत बनवा क्रिस्पी चटपटी मटर कचोरी! चहासोबत खासच लागते मटार कचोरी; नक्की ट्राय करा सोपी रेसिपी
Winter healthy recipe in marathi olya toorichya danyanchi bhaji recipe in marathi
चटकदार व झणझणीत विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी; हिवाळ्यातली अतिशय पौष्टीक रेसिपी एकदा नक्की ट्राय करा
Roasted chana with kishmish benefits
उपाशीपोटी हरभरा आणि मनुक्यांचे सेवन केल्याने होतात अनेक फायदे
eating in a bowl is a good practice Or Not
Malaika Arora: मलायका अरोराने सांगितल्याप्रमाणे बाऊलमध्ये खाणे ‘हा’ एक चांगला पर्याय असू शकतो का? तज्ज्ञ म्हणतात की…
paneer bhaji recipe
या थंडीत बटाटा आणि कांदा भाजी खाऊन कंटाळलात? मग पनीरची ही नवीकोरी रेसिपी करा ट्राय
Soaking Dry Fruits
रात्रभर पाण्यात भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाणं योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे उत्तर…

कृती

  • एका कढईत जवस कमी आचेवर पाच मिनिटे भाजून घ्या.
  • जवस काढून एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवा
  • त्याच कढईत तूप घ्या.
  • या तूपात बदाम आणि काजू तळून घ्या
  • त्यानंतर त्याच तूपात डिंक मंच आचेवर लाही होईपर्यंत तळून घ्यावा.
  • त्यानंतर त्याच तूपात मंद आचेवर गव्हाचं पीठ भाजून घ्या.
  • आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले जवस जाडसर बारीक करा.
  • त्यानंतर तळलेले काजू , बदाम,आणि तळलेले डिंक मिक्सरमधून बारीक करा.
  • आता लाडू बनवण्यासाठी पाक तयार करू या.
  • एका कढईत पाणी घ्या आणि त्यात साखर आणि गूळ घाला.
  • मंद आचेवर साखर आणि गूळ विरघळून घ्या,
  • त्यानंतर गॅस मोठा करून या पाण्याला उकळी येऊ द्या.
  • उकळी आली की मंद आचेवर दोन मिनिटे या पाण्याला शिजून घ्या.
  • भाजून घेतलेले गव्हाचे पीठ यात टाका आणि आणि चांगले शिजवून घ्या.
  • दाटसरपणा आला की यात बारीक केलेले जवस, ड्रायफ्रुट्स आणि डिंक घालू या.
  • ही सर्व प्रक्रिया मंद आचेवर करायची आहे.
  • त्यानंतर गॅस बंद करावा
  • मिश्रण थंड होण्याची वाट पाहू नये आणि तुमच्या आकारानुसार लाडू बनवावे.
  • जवसाचे लाडू तयार होईल.

Story img Loader