Kandyachya Paticha Jhunka : झुणका-भाकर हा महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. झुणका हा अत्यंत पौष्टीक आणि तितकाच टेस्टी असतो. आज आम्ही तुम्हाला झुणक्याचा नवा प्रकार सांगणार आहोत. तुम्ही कधी कांद्याच्या पातीचा झुणका खाल्ला आहे का? जर नाही तर ही रेसिपी ट्राय करा आणि घरच्या घरी टेस्टी कांद्याच्या पातीचा झुणका बनवा.
साहित्य :-
कांद्याची पात
हरभरा डाळीचं पीठ
हळद
मिरची पावडर
तेल
जिरं
मोहरी
पाणी
मीठ
कृती :
कांद्याची पात स्वच्छ धुवून घ्यावी
त्यानंतर बारीक पात चिरून घ्यावी .
त्यात डाळीचं पीठ , तिखट , मीठ घालावे
आणि मिश्रण एकत्र करावे.
जिरं-मोहरीची फोडणी द्यावी आणि त्यात हे मिश्रण घालावे
त्यात थोडे पाणी टाकावे
मिश्रण चांगले परतून घ्यावे
झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ येऊ दयावी .
त्यानंतर झाकण काढावे आणि मंद आचेवर झुणका होऊ द्यावा.