Kandyachya Paticha Jhunka : झुणका-भाकर हा महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. झुणका हा अत्यंत पौष्टीक आणि तितकाच टेस्टी असतो. आज आम्ही तुम्हाला झुणक्याचा नवा प्रकार सांगणार आहोत. तुम्ही कधी कांद्याच्या पातीचा झुणका खाल्ला आहे का? जर नाही तर ही रेसिपी ट्राय करा आणि घरच्या घरी टेस्टी कांद्याच्या पातीचा झुणका बनवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :-

कांद्याची पात
हरभरा डाळीचं पीठ
हळद
मिरची पावडर
तेल
जिरं
मोहरी
पाणी
मीठ

हेही वाचा : weet Corn Soup : टोमॅटो सार खाऊन कंटाळलात? मग टेस्टी अन् हेल्दी मक्याचे सार बनवा, नोट करा झटपट होणारी ही रेसिपी

कृती :

कांद्याची पात स्वच्छ धुवून घ्यावी
त्यानंतर बारीक पात चिरून घ्यावी .
त्यात डाळीचं पीठ , तिखट , मीठ घालावे
आणि मिश्रण एकत्र करावे.
जिरं-मोहरीची फोडणी द्यावी आणि त्यात हे मिश्रण घालावे
त्यात थोडे पाणी टाकावे
मिश्रण चांगले परतून घ्यावे
झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ येऊ दयावी .
त्यानंतर झाकण काढावे आणि मंद आचेवर झुणका होऊ द्यावा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jhunka recipe kandyachya paticha jhunka spring onion bhaji recipe in marathi food lovers maharastrian food ndj
Show comments