Jowar Khichdi Recipe : ज्वारी ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे अनेक जण पोळीपेक्षा ज्वारीची भाकरी आवर्जून खातात पण तुम्ही ज्वारीची खिचडी खाल्ली आहे का? पचायला हलकी ज्वारीची खिचडी खूप स्वादिष्ट लागते. ही ज्वारीची खिचडी कशी बनवायची, हे आज आपण जाणून घेणार आहोत. ही सोपी रेसिपी नोट करा

साहित्य

  • ज्वारी
  • लसूण
  • खोबरे
  • कोथिंबीर
  • तेल
  • मोहरी
  • जिरे
  • हिंग
  • कढीपत्ता
  • बारीक चिरलेला कांदा
  • गाजर
  • मटार
  • मुग डाळ
  • तुरीची डाळ
  • तूप
  • पाणी

हेही वाचा : Chinese Veg Fried Rice : घरीच बनवा स्ट्रीट स्टाइल चायनिज व्हेज फ्राइड राइस, सोपी रेसिपी लगेच नोट करा

how to make phulka
फुलका फुगत नाही? जाणून घ्या परफेक्ट फुलके बनवण्याच्या खास टिप्स
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Boondi curry recipe in Marathi how to make Boondi curry recipe
रोज काय भाजी करावी सुचत नाही? घरात असलेल्या बुंदीची करा “बूंदी करी”; झक्कास होईल बेत
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
matar kachori recipe in marathi
कुरकुरीत खायची इच्छा होतेय? मग लगेच बनवा ‘मटार कचोरी’, सोपी रेसिपी लिहून घ्या
Fried Modak Recipe
Modak Recipe : माघी गणेश जयंतीला फक्त १ वाटी गव्हाच्या पिठाचे बनवा कुरकुरीत ‘मोदक’; रेसिपी वाचा पटकन
Khandeshi Shev Bhaji Recipe In Marathi
अस्सल झणझणीत खानदेशी शेव भाजी, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी
Anda Masala Curry Recipe In Marathi
नॉन व्हेज प्रेमींसाठी खास रेसिपी! झणझणीत ‘अंडा मसाला करी’ आजच करा ट्राय, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी

कृती :

  • ज्वारी सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्या आणि पाण्यात अर्ध्या तासासाठी भिजू घाला.
  • त्यानंतर ती चाळणीमध्ये निथळून घ्या
  • ज्वारीतील पाणी काढून टाका आणि ज्वारी मिक्सरमधून पाणी न टाकता बारीक करा ज्यामुळे ज्वारीचा भरडा होईल.
  • लसूण, खोबरे आणि कोथिंबीर एकत्र करा आणि मिक्सरमधून बारीक करा
  • सुरुवातीला कुकरमध्ये तेल गरम करा
  • गरम तेलात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता टाका
  • त्यात बारीक चिरलेला कांदा टाका आणि परतून घ्या
  • त्यात हळद घाला आणि चवीनुसार हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घाला.
  • लसूण, खोबरे आणि कोथिंबीरचे बारीक केलेले मिश्रण यात टाका आणि परतून घ्या
  • त्यानंतर त्यात गाजर, मटार टाका आणि चांगले परतून घ्या.
  • त्यानंतर मूग डाळ आणि तुरीची डाळ स्वच्छ धुवून यात टाका.
  • त्यानंतर मिक्सरमधून बारीक केलेलं ज्वारीचं पीठ घाला आणि चांगलं परतून घ्या
  • ज्वारीच्या खिचडीला पाणी भरपूर लागतं त्यामुळे एक कप ज्वारीला चार कप पाणी टाकावे. या प्रमाणानुसार पाणी घाला.
  • मंद आचेवर कुकरच्या दोन शिट्ट्या होऊ द्या.
  • खिचडी शिजल्यानंतर त्यावर तूप टाकून गरम गरम ज्वारीच्या खिचडीचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता

Story img Loader