तुम्हाला पुरी खायला आवडते का? आवडत असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक हटके रेसिपी आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या नेहमीच खात असाल पण तुम्ही कधी ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या खाल्या आहेत का? नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्यांची चव तुम्हाला नक्की आवडेल. या पुऱ्या तयार करणे देखील अत्यंत सोपे आहे. घरी पाहुणे आल्यावर काहीतरी वेगळा पदार्थ बनवायचा असेल तर या पुऱ्या नक्की बनवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या | ज्वारीच्या पिठाची मसाला पुरी

साहित्य
ज्वारीचे पीठ दिड कप
ओवा अर्धा टी स्पून
बेसन दोन टे स्पून
मीठ
हळद अर्धा टी स्पून
तिखट दिड टी स्पून
धना-जीरा पुड दीड टी स्पून
तीळ एक टे स्पून
हिंग पाव टी स्पून
लसुण- मिरची पेस्ट
कोथिंबीर
तेल १ टी स्पून
पाणी

हेही वाचा – Recipe : आजीबाईंची खास ‘उपवास’ रेसिपी; कशा बनवायच्या रताळ्याच्या गोड फोडी पाहा

कृती
सर्वप्रथम एका भांड्यात ज्वारीचे पीठ घ्या.
त्यात ओवा, बेसन, मीठ, हळद, तिखट, धना-जीरा पुड, तीळ हिंग, लसून -मिरची पेस्ट, कोथिंबीर टाका. थोडेसे पाणी आणि तेल टाकून पीठ मळून घ्या.
त्यानंतर एका त्याच्या छोटी पुरी लाटून घ्या. गरम तेलात तळून घ्या.
सोनरी रंग येई पर्यंत पुरी तळा.
गरम गरम पुरी -भाजीसह खा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jwarichi masala puri jowar puri how to make songram aata puri snk
Show comments