पपई आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. बरेच लोक असे मानतात की, जर आपल्याला वजन कमी करायचे असेल किंवा पोटाची कोणतीही समस्या दूर करायची असेल तर पपईचे सेवन करणे हा उत्तम उपाय आहे.पिकलेल्या पपईप्रमाणेच कच्च्या पपईमध्ये एक नाही तर अनेक प्रकारचे पोषक असतात. पण अनेक वेळा घरात जास्त कच्ची पपई असल्याने अनेकजण ती निरुपयोगी समजून फेकून देतात. तर फेकून न देता अशाप्रकारे या तीन सोप्या रेसिपी बनवा.
कच्या पपईची सुकी भाजी साहित्य
- १ लहान पपई
- १ टेबलस्पून जीरे +हिरवी मिरची ठेचा
- ३ टेबलस्पूून उडीद डाळ
- १ टेबलस्पून जीरे ,मोहरी
- १/२ टेबलस्पून हिंग
- १ टेबलस्पून हळद
- ३ टेबलस्पूून तेल
- ३ टेबलस्पूून ओले खोबरे
- कोथिंबीर,कडीपत्ता पाने
- चवीनुसार मीठ
- १/२ लिंबू रस
कच्या पपईची सुकी भाजी कृती
- १ टेबलस्पून जीरे +हिरवी मिरची ठेचा, ३ टेबलस्पूून उडीद डाळ आणि पपई, ठेचा तयार करून घेऊ या..
- ठेचा तयार करताना जीरे, हिरवी मिरची,आले, बारीक करून घ्या.
- आता लोखंडी कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग कढीलिंब,हळद ठेचा घालून खमंग फोडणी करावी.उडीद डाळ घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
- मग पपई घालून एकजीव करा.आता मीठ घालून झाकण ठेवून वाफ काढावी.चांगली वाफ आल्यावर त्यात खोबरे, लिंबू रस घालून एकजीव करा.
हेही वाचा >> सुका बोंबील रस्सा; प्रेशर कुकरमध्ये अशा पद्धतीने एकदा नक्की बनवा; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
- शिजल्यावर त्यात कोथिंबीर घालून गार्निश करून सर्व्ह करा.खुप सुंदर चविष्ट भाजी तयार आहे.