Kadai Paneer Recipe  : पनीर हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतो. काही लोक पनीर अनेक पदार्थांमध्ये आवडीने टाकतात. पनीरच्या अनेक भाज्या किंवा पराठा तुम्ही खाल्ला असेल. ढाबावरील कढाई पनीरची टेस्ट ही वेगळीच असते पण तुम्ही कधी ढाबा स्टाईल कढाई पनीर घरी बनवले आहे का? चला तर ही सोपी रेसिपी जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

पनीर
तेल
हळद
लाल तिखट
मीठ
शिमला मिरची
लवंग
वेलची
कांदा
टोमॅटो
हळद
लाल तिखट
धने पुड
कसूरी मेथी
जिरे
तेजपान
दालचिनी

हेही वाचा : Spicy Kobi Paratha : असा बनवा कोबीचा झणझणीत पराठा, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

कृती

सुरुवातीला पनीर दहा मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा.
त्यानंतर पनीरचे मध्यम आकाराचे काप तयार करा.
कापलेल्या पनीरच्या तुकड्यांमध्ये हळद, मीठ आणि लाल तिखट टाका आणि हे मिश्रण एकत्र करा.
त्यानंतर हे पनीर दहा मिनिटे झाकून ठेवा.
एका कढईत तेल गरम करा. त्यात हे पनीरचे तुकडे तळून घ्या
त्यानंतर चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेला कांद्या तळून घ्या.
त्यानंतर गरम तेलात लवंग, वेलची परतून घ्या आणि त्यात पुन्हा चिरलेला कांदा चांगला परतून घ्या.
त्यात आलं लसणाची पेस्ट टाका
त्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो त्यात टाका आणि थोडे मीठ टाका
हे मिश्रण थंड होऊ द्या त्यानंतर हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करा.
त्याच कढईत पुन्हा तेल गरम करा
त्यात जिरे, दालचिनी, आणि तेजपान टाका.
तयार केलेली कांदा टोमॅटोची पेस्ट यात टाका आणि चांगले परतून घ्या.
त्यानंतर यात हळद, लाल तिखट, धने पूड टाका
मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यात पाणी घाला
तळलेला कांदा आणि शिमला मिरची यात टाका
आता यात गरम मसाला टाका
त्यानंतर तळून घेतेलेले पनीर यात टाका आणि चांगले परतून घ्या. त्यानंतर कसूरी मेथी टाका
थोडा वेळ शिजवल्यानंतर त्यात कोथिंबीर टाका
तुमचे कढाई पनीर तयार होईल.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kadai paneer recipe how to make kadai paneer at home like dhaba style note down recipe food news paneer lovers ndj
Show comments