Kadhi Gole : हिवाळ्यात तुरीच्या शेंगा बाजारात विकायला येतात. अशात तुरीच्या शेंगापासून तुम्ही अनेक पौष्टिक पदार्थ बनवू शकता. तुम्ही तुरीच्या दाण्याची आमटी, झुणका खाल्ला असेल पण तुम्ही कधी कढी गोळे रेसिपी केली आहे का? तुरीच्या दाण्यापासून गोळे आणि ताकापासून कढी बनवून तुम्ही कढी गोळ्यांचा आस्वाद घेऊ शकता. हे कढी गोळे खास करुन विदर्भात बनवले जातात. कढी गोळे हे अत्यंत पौष्टिक आणि तितकेच चवीला स्वादिष्ट असतात. हे कढी गोळे कसे बनवायचे, आज आपण जाणून घेणार आहोत.

साहित्य

  • तुरीचे दाणे
  • बेसन
  • ताक
  • जिरे
  • हिरव्या मिरच्या
  • लसणाच्या पाकळ्या
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • धनेपूड
  • तेल
  • मेथीचे दाणे
  • हिंग
  • मोहरी
  • आलं लसणाची पेस्ट
  • हळद
  • कोथिंबीर
  • तेल
  • मीठ

हेही वाचा : Jawas Ladoo : हिवाळ्यात खा जवसाचे लाडू, जाणून घ्या ही सोपी रेसिपी

Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
How To Make Matar Kachori At Home Matar Kachori recipe in marathi
थंडीत बनवा क्रिस्पी चटपटी मटर कचोरी! चहासोबत खासच लागते मटार कचोरी; नक्की ट्राय करा सोपी रेसिपी
Nano Fertilisers loksatta marathi news
लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार
Gajar Rabdi Recipe,
थंडीच्या दिवसात बनवा गरमागरम ‘गाजर रबडी’, रेसिपी वाचूनच तोंडाला सुटेल पाणी, लिहून घ्या सोपी साहित्य आणि कृती
Eight new crop varieties developed for commercial cultivation
‘बीएआरसी’कडून आठ नवीन पिकांचे वाण विकसित, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तांदूळ, तीळाच्या वाणांची निर्मिती
Dapoli Mango Cashew Production, Dapoli Mango,
थंडीने रत्नागिरी जिल्हा गारठला; आंबा काजू उत्पादनात वाढ होण्याची व्यावसायिकांना आशा
methi puri recipe
हिरव्यागार मेथीची टम्म फुगलेली पुरी अशी बनवा! सोपी रेसिपी जाणून घेण्यासाठी पाहा VIDEO

कृती

  • सुरुवातीला तुरीचे दाणे स्वच्छ धुवून घ्या
  • एका कढईत तेल गरम करा. त्यात जिरे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे, कढीपत्ता चांगले परतून घ्या.
  • त्यात तुरीचे दाणे घाला आणि मध्यम आचेवर परतून घ्या.
  • यात थोडी कोथिंबीर आणि धनेपूड घाला आणि पुन्हा परतून घ्या.
  • त्यात चवीनुसार मीठ घाला आणि हे सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक करा.
  • यात मिश्रणामध्ये थोडे बेसन घाला आणि मिश्रण एकजीव करा.
  • त्यानंतर या मिश्रणावर थोडे तेल टाका.
  • हाताला तेल लावून त्याचे गोळे करावे.
  • एका भांड्यात ताक घ्या त्यात बेसन घाला आणि रवीने एकत्र करा.
  • त्यात थोडे पाणी घाला
  • एका कढईत तेल गरम करा.
  • त्यात जिरे, मोहरी, मेथीचे दाणे, आलं लसणाची पेस्ट, कढीपत्ता, चिमुटभर हिंग, लसणाचे काप, बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला.
  • त्यानंतर त्यात हळद, धनेपूड घाला
  • आणि त्यात बेसन घातलेले ताक यात टाका.
  • कमी आचेवर उकळी येतपर्यंत कढी ढवळत राहा
  • त्यात चवीनुसार मीठ घाला.
  • उकळी आल्यानंतर त्यात तुरीच्या दाण्याचे गोळे टाका आणि मध्यम आचेवर शिवजून घ्या.
  • कढी गोळे तयार होईल त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा.

Story img Loader