Kadhi Gole : हिवाळ्यात तुरीच्या शेंगा बाजारात विकायला येतात. अशात तुरीच्या शेंगापासून तुम्ही अनेक पौष्टिक पदार्थ बनवू शकता. तुम्ही तुरीच्या दाण्याची आमटी, झुणका खाल्ला असेल पण तुम्ही कधी कढी गोळे रेसिपी केली आहे का? तुरीच्या दाण्यापासून गोळे आणि ताकापासून कढी बनवून तुम्ही कढी गोळ्यांचा आस्वाद घेऊ शकता. हे कढी गोळे खास करुन विदर्भात बनवले जातात. कढी गोळे हे अत्यंत पौष्टिक आणि तितकेच चवीला स्वादिष्ट असतात. हे कढी गोळे कसे बनवायचे, आज आपण जाणून घेणार आहोत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
साहित्य
- तुरीचे दाणे
- बेसन
- ताक
- जिरे
- हिरव्या मिरच्या
- लसणाच्या पाकळ्या
- कढीपत्ता
- कोथिंबीर
- धनेपूड
- तेल
- मेथीचे दाणे
- हिंग
- मोहरी
- आलं लसणाची पेस्ट
- हळद
- कोथिंबीर
- तेल
- मीठ
हेही वाचा : Jawas Ladoo : हिवाळ्यात खा जवसाचे लाडू, जाणून घ्या ही सोपी रेसिपी
कृती
- सुरुवातीला तुरीचे दाणे स्वच्छ धुवून घ्या
- एका कढईत तेल गरम करा. त्यात जिरे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे, कढीपत्ता चांगले परतून घ्या.
- त्यात तुरीचे दाणे घाला आणि मध्यम आचेवर परतून घ्या.
- यात थोडी कोथिंबीर आणि धनेपूड घाला आणि पुन्हा परतून घ्या.
- त्यात चवीनुसार मीठ घाला आणि हे सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक करा.
- यात मिश्रणामध्ये थोडे बेसन घाला आणि मिश्रण एकजीव करा.
- त्यानंतर या मिश्रणावर थोडे तेल टाका.
- हाताला तेल लावून त्याचे गोळे करावे.
- एका भांड्यात ताक घ्या त्यात बेसन घाला आणि रवीने एकत्र करा.
- त्यात थोडे पाणी घाला
- एका कढईत तेल गरम करा.
- त्यात जिरे, मोहरी, मेथीचे दाणे, आलं लसणाची पेस्ट, कढीपत्ता, चिमुटभर हिंग, लसणाचे काप, बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला.
- त्यानंतर त्यात हळद, धनेपूड घाला
- आणि त्यात बेसन घातलेले ताक यात टाका.
- कमी आचेवर उकळी येतपर्यंत कढी ढवळत राहा
- त्यात चवीनुसार मीठ घाला.
- उकळी आल्यानंतर त्यात तुरीच्या दाण्याचे गोळे टाका आणि मध्यम आचेवर शिवजून घ्या.
- कढी गोळे तयार होईल त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा.
First published on: 14-12-2023 at 17:34 IST
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kadhi gole recipe how to make kadhi gole marathi food recipe ndj