अनेकदा जेवण करताना भाजी बनवायचा कंटाळा येतो, पण भाजी नसली तरी काहीतरी चवदार खाण्याचा मोह आवरत नाही. जेवणाबरोबर काहीतरी असं हवंच ज्यामुळे जेवल्यासारखं वाटेल. म्हणून अनेकदा आपल्याला लोणच्याची आठवत येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्याकडे कितीही वर्षभराचे लोणचे असलं तरी यावेळेस झटपट ताज्या कैरीचे लोणचं तोंडी लावायला जास्त आवडते. आज आपण सगळ्यांच्या आवडीच्या कैरीच्या लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत.

हेही वाचा… रेस्टॉरंट स्टाईल ‘मसाला चाप’ आता घरच्या घरीच बनवा, सोपी रेसिपी लगेच लिहून घ्या

साहित्य

1 तोतापुरी कैरी

गरजेनुसार लोणचे मसाला

1/2 कप शेंगदाण्याचे तेल

1 टेबलस्पून लाल मिरची पावडर

1/2 टेबलस्पून हिंग

हेही वाचा… सकाळी झटपट नाश्ता बनवायचाय? मग एक वाटी बेसनापासून बनवा ‘ही’ सोपी रेसिपी

कृती

सर्वात आधी कैरी स्वच्छ धुवून पुसून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्या.

आता कैरीला थोडे हलकेसे हळद आणि मीठ लावून पाच दहा मिनिट ठेवा.

आता कढईत तेल तापवून गॅस बंद करून घ्या.

तेल थंड झाल्यावर त्यात हिंग, लाल मिरची टाका.

आता त्यात लोणच्याचा मसाला दोन ते तीन चमचे टाकून घेतला आणि कैरी टाकून मिक्स करून घेतले.

इन्स्टंट कैरीचे लोणचे तयार आहे.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kairiche lonche recipe how to make instant kairi loncha in marathi dvr