Kaju Biscuit Recipe : सकाळ असो किंवा संध्याकाळ चहाबरोबर बिस्कीट खायला आपल्या सगळ्यांनाच आवडते. कधी ऑफिसला जायला उशीर झाला की आपण बाहेर एखादा बिस्कीटपुडा विकत घेतो आणि खातो. पण, जर तुम्हाला ही बिस्किटे घरीच बनवता आली तर? सोशल मीडियावर एका युजरने काजूची बिस्किटे बनवून दाखवली आहेत. तर काजू बिस्कीट (Kaju Biscuit ) बनवण्यासाठी काय साहित्य लागेल जाणून घेऊया…

साहित्य (Kaju Biscuit Ingredients) :

  • १/४ कप तूप
  • १/२ कप पिठीसाखर
  • एक कप मैदा
  • दोन चमचे कस्टर्ड पावडर
  • १/२ चमचा बेकिंग सोडा
  • चिमूटभर मीठ
  • १/३ कप काजू पावडर
  • दोन चमचे दूध पावडर
  • वेलची पावडर

हेही वाचा…Almond Cake : बर्थडेसाठी कुकरमध्ये बनवा बदामाचा केक, विकतसारखा मऊसूत केक घरच्या घरी तयार

Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
Makar sankranti 2025 special bhogi bhaji recipe in marathi and health benefits everyone should know
“भोगीची भाजी” एकदम चमचमीत आणि पारंपारिक रेसिपी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
how to make Kolhapuri style bhadang
Kolhapuri Bhadang: ऑफिसमध्ये संध्याकाळी भूक लागते? मग चटपटीत, ‘कोल्हापूरी भडंग’चा डब्बा ठेवा बॅगेत; वाचा झटपट होणारी सोपी रेसिपी
amaltash movie
सरले सारे तरीही…
balmaifal story for children
बालमैफल : मी… अनादी, अनंत!
Special Makar Sankranti Ukhane in Marathi
Makar Sankranti Ukhane : महिलांनो, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या एकापेक्षा एक हटके उखाणे, एकदा लिस्ट पाहाच

व्हिडीओ नक्की बघा…

कृती (How To Make Kaju Biscuit) :

  • एका भांड्यात तूप आणि पिठीसाखर घ्या आणि व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर भांड्यावर चाळणी ठेवा आणि त्यात मैदा, कस्टर्ड पावडर, बेकिंग सोडा टाकून चाळून घ्या.
  • नंतर त्यात मीठ, काजू पावडर, दूध पावडर, वेलची पावडर टाका आणि हाताने मिस्क करून घ्या.
  • त्यानंतर मिश्रणाचे पीठ मळून घ्या. मिश्रण एकत्र करण्यासाठी थोडे दूध घालू शकता.
  • तुमच्या मनाप्रमाणे पिठाचे गोळे करून त्याला आकार द्या आणि त्याच्यावर एक काजू लावा.
  • बेक करण्यापूर्वी १५ मिनिटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
  • १७ डिग्री सेल्सियस वर १५ मिनिटे बेक करावे.
  • अशाप्रकारे तुमचे काजूचे बिस्कीट तयार (Kaju Biscuit).

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @lakshmi_kitchen26 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

काजू खाण्याचे आरोग्यदायी फायदे

काजू हे सुक्यामेव्यातील सर्वांचे आवडते फळ आहे. काजूची भाजी, मिठाई, भाजलेले किंवा कच्चे काजू अशा वेगवेगळ्या प्रकारे काजू खायला आपल्याला आवडते. भारतातील अनेक राज्यांमध्ये काजूची लागवड केली जाते. याच्या झाडाची उंची १४ मीटर असते. या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे ते खूप वेगाने वाढते. काजूमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि प्रथिने आढळतात. यासह मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी अशी पोषक तत्वे देखील आढळतात. म्हणजेच बहुतांश सर्वांना आवडणारे काजू आरोग्यासाठी भरपूर गुणकारी आहेत.

Story img Loader