काजू हे कोकणातील मुख्य फळपीक आहे. कोकणात काजू बी व काजू टरफल प्रक्रिया मोठ्या प्रमाणात केली जाते. त्या तुलनेत काजू बोंडाची प्रक्रिया अत्यंत कमी प्रमाणात होते. त्यामुळे जवळपास ९० टक्के काजूची बोंडे प्रक्रियेअभावी वाया जातात. वाया जाणाऱ्या काजू बोंडापासून सरबत, सिरप, स्क्वॅश, जॅम, चटणी, कॅन्डी, नेक्टर, काजू फेणी, लोणचे, बर्फी, पावडर असे अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. तर आज आपण याच काजुच्या बोंडाचे सरबत बनवणार आहोत. चला तर याची सोपी रेसिपी पाहुयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काजु बोंडाचे सरबत साहित्य

८-१० काजु बोंड फळ
४० ग्रॉम साखर
१ टिस्पुन भाजलेल्या जिर्‍याची पावडर
१/२ टिस्पुन मिरपुड
१-२ टिस्पुन लिंबाचा रस
५-६ बर्फा चे क्युब
चविनुसार मिठ

काजु बोंडाचे सरबत कृती

१. काजु बोंड स्वच्छ धुवुन त्यातील काजुबिया वेगळ्या काढुन बोंडाचे तुकडे करून घ्या मिक्सर जारमध्ये साखर, मिरपुड, भाजलेली जिरेपुड मिक्स करा

२. साखरेची पावडर करून काढुन ठेवा

३. नंतर त्याच जारमध्ये काजुची कापलेली बोंड व पाणी मिक्स करून फिरवुन घ्या व नंतर चाळणीने गाळुन ठेवा

४. चोथा बाजुला काढा ह्या मिश्रणात तयार केलेली पिठीसाखर, चवीनुसार मिठ मिक्स करून ढवळुन घ्या

५. शेवटी त्यात लिंबाचा रस मिक्स करून ढवळा आपले काजु बोंडाचे सरबत रेडी.

हेही वाचा >> “कारल्याचे वडे” कारलं न आवडणारेही आवडीने खातील! ही घ्या सोपी मराठी रेसिपी

६. ग्लासात बर्फाचे क्युब घेऊन त्यात तयार सरबत ओतुन सर्व्ह करा

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kaju bondu sarbat process on kaju bond kaju sherbat cashew apple juice recipe srk