Kaju curry recipe in marathi: काजू हे सगळ्यांच्या आवडीचं ड्राय फ्रूट आहे. अनेक गोड पदार्थात याचा समावेश होतो. लहान मोठ्या पदार्थांपासून ते मोठमोठ्या पदार्थांपर्यंत काजुचा वापर होतो. तुम्ही घरी अनेकदा काजुची भाजी खाल्ली असेल. ती अगदी चविष्ट लागते. पण काजुचे अजून वेगळे पदार्थ नेमके काय बनवायचं, आणि ते चवदार असतील का असा प्रश्न गृहिणींना पडतो. तोच प्रश्न आज आपण सोडवणार आहोत. आज आपण काजुकरीची रेसिपी जाणून घेणार आहोत.

साहित्य

  • 1 कप काजु
  • 1/2 कप गरम पाणी
  • 1 मध्यम कांदा ऊभा चिरून
  • 1/4 कप ओल नारळ चिरून
  • 2 टेबलस्पून मगज बी
  • 2-3 लसुण पाकळ्या
  • 1 ” आल
  • 4 टेबलस्पून तेल
  • 4 टेबलस्पून बटर
  • 1/2 कप टोमॅटो प्युरी
  • 1/4 टीस्पून हळद
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • 1 टीस्पून कश्मिरी लाल तिखट
  • 1/2 टीस्पून कीचन किंग मसाला
  • 1/4 टीस्पून कसुरी मेथी
  • 1/4 कप फ्रेश क्रीम
  • 1/4 टीस्पून गुळ

कृती

काजू गरम पाण्यात २० मिनिट भिजत घालून ठेवावे.

ग्रेव्हीचा मसाला करण्यासाठी एका कढईत २ टेबलस्पून तेल व बटर घालून कांदा,नरळ,आल,लसूण व मगज बी परतून घ्यावे.

तयार मसाला मिक्सरमधून अगदी बारिक पेस्ट होइपर्यंत फिरवून घ्यावा.

आता एका पॅनमधे तेल व २ टेबलस्पून बटर घालून तयर ग्रेव्हीचा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा.

लाल तिखट, कश्मिरी लाल तिखट, मीठ, हळद व कीचन किंग मसाला घालून परतून घ्यावे.

आता मसाल्यावर तयार टोमॅटो प्युरी घालून शिजवून घ्यावे. गुळ घालुन मिक्स करून घ्यावे.

शेवटी फ्रेश क्रीम घालून मखमली ग्रेव्ही तयार झाली की ग्रेव्हीत गरम पाण्यात भिजवून ठेवलेले काजु निथळून ग्रेव्हीत घालावे. आपली काजुकरी तयार आहे.

तयार गरमागरम काजुकरी नान व बुंदी रायता बरोबर सर्व्ह करावी.