दिवाळी आता दोन दिवसांवर आली आहे. घरोघरी महिलांची फराळाची घाई सुरु आहे. एक एक पदार्थ महिला बनवत आहेत. यातच दिवाळीत घरोघरी पाहायला मिळणारी मिठाई म्हणजे काजू कतली. बरेचजण मिठाई बाहेरुन आणतात. घरी कुणी करत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी ही रेसिपी कशी करायची हे सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात घरच्या घरी सोप्या पद्धतीत काजू कतली कशी करायची. त्यामुळे आता दिवाळी आणि भाऊबीजच्या दिवशी बनवा मार्केट सारखी परफेक्ट काजुकतलीची रेसिपी…

काजू कतली साहित्य

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
  • १ कप काजू
  • १/४ कप मिल्क पावडर
  • ३/४ कप साखर
  • १/४ कप+ २ टेबलस्पून पाणी

काजू कतली कृती

स्टेप १
काजूची बारीक पावडर करून घ्या. यानंतर बारीक चाळणीने पावडर चाळून घ्यावे. त्यामधे आता मिल्क पावडर मिसळून घ्या.

स्टेप २
आता कढईत साखर घालून त्यात साखर बुडेल इतपत पाणी घालून पाक करुन घ्या. पाक दोन तारी झाल्यावर गॅस बंद करा. आता त्यामध्ये वरील मिश्रण घालून चांगले मिसळून घ्या. परत गॅस चालू करा. मिश्रणाचा गोळा होऊ लागला की गॅस बंद करा.

हेही वाचा >> १/२ किलो बेसनाचे, तुपाच्या योग्य प्रमाणात दाणेदार बेसन लाडू; बेसन भाजण्याच्या ‘या’ खास पद्धतीनं बनवा परफेक्ट लाडू

स्टेप ३
लगेचच बटर पेपरवर हे कढईतले मिश्रण घालून पटपट लाटून घ्या. तुम्हाला आवडत असल्यास चांदीचा वर्ख लावा.

स्टेप ४
यानंतर वड्या पाडून डिलिशिअस् काजू कतली सर्व्ह करा. अशाप्रकारे तुमची काजू कतली तयार आहे.

Story img Loader