जेवणात त्याच त्यात भाज्या खाऊन कंटाळा आला की एखादा पारंपारीक पदार्थ खावासा वाटतो.जेव्हा येतो भाजी बनवायचा कंटाळा, नकोसे वाटते वांग,बटाटा,काकडी अन मुळा..खावंसं वाटत काही झटकन होणारे आणि हलकं फुलकं, तेव्हा जरूर बनवून पहा ही रेसिपी. हॉटेलसारख्या चवीची मसाला काजू पनीर, चला तर पाहुयात याची रेसिपी
काजूच्या ग्रेव्हीतली पनीर साहित्य –
- पनीर- लांब तुकडे,
- काजू (साधारण पाव वाटी) भिजवून त्याची पेस्ट
- बारीक चिरलेला कांदा (पाव कांदा)
- आलं लसूण पेस्ट
- लाल तिखट
- रजवाडी गरम मसाला
- हळद, जिरं, तेल
- थोडी कसुरी मेथी
- वरून थोडं क्रिम
- चवीप्रमाणे मीठ,वरून कोथिंबीर
काजूच्या ग्रेव्हीतली पनीर कृती –
- काजू निदान तासभर तरी पाण्यात भिजवून पेस्ट करून घ्यावी.
- पनीर रूम टेंप.ला आणून बोटाएवढे लांब तुकडे करून घ्यावेत.
- कांदा अगदी बारीक चिरावा म्हणजे भाजीत दिसणारही नाही.
- तेलाची जिरं घालून फोडणी करून त्यात कांदा चांगला परतावा. त्यावर आलं लसूण पेस्ट, रजवाडी गरम मसाला, लाल तिखट घालून आणखी परतावा.
- मग त्यात काजूची पेस्ट घालून मिक्स करावं. त्यातच थोडी हळद घालून चुरून कसूरी मेथीही घालावी (साधारण दोन चमचे पुरेल).
हेही वाचा >>
- मग त्यात पनीर घालून बारीक गॅसवर उकळी काढावी. वरून थोडं क्रिम घालून कोथिंबीर घालून सर्व करावं.