काजू हे असा सुका मेवा आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. काजूचा अनेक पदार्थांमध्ये वापर केला जातो पण तुम्ही कधी काजूची उसळ खाल्ली आहे का? काजूची उसळ अत्यंत पौष्टिक आणि तितकीट टेस्टी असते. जर तुम्हाला घरी काजूची उसळ खायची असेल तर तुम्ही ही सोपी रेसिपी जाणून घ्या. ही काजूची उसळ तुम्ही एकदा खाल्यानंतर पुन्हा पुन्हा बनवाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :-

  • काजू
  • धने
  • जिरे
  • सुक्या मिरच्या
  • ओलं खोबरं
  • मीठ

हेही वाचा : Sabudana Vada : साबुदाणा वडा कुरकुरीत करण्यासाठी जाणून घ्या सोप्या टिप्स, लिहून घ्या ही रेसिपी…

कृती

  • काजू पाण्यात भिजवा.
  • आणि नीट सोलून घ्या.
  • धने , जिरे आणि सुक्या मिरच्या गरम करा.
  • त्यात ओलं खोबरं टाका आणि सर्व पदार्थ मिक्सरमधून बारीक करा
  • त्यानंतर एका कढईत तेल गरम करा आणि फोडणी द्या
  • त्यात काजू टाका.
  • काजू चांगले परतून घ्या आणि त्यात थोडे पाणी टाका
  • उकळी आल्यानंतर चवीपुरतं त्यात मीठ घाला.
  • त्यात मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला टाका.
  • थोडा वेळ शिजल्यानंतर काजूची उसळ तयार होईल.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kaju usal recipe how to make it tasty dish cashew dry fruit lovers ndj
Show comments