Kaleji Pav Recipe In Marathi: एखाद्या व्यक्तीच्या मनात घर करण्याचा रस्ता पोटातून जातो असे शब्द तुमच्या कानावर पडले असतील. यात जर समोरच्या व्यक्तीला नॉन व्हेज आवडत असेल, तर आवडीचे चमचमीत खाद्यपदार्थ तयार करुन त्याला खुश करता येते. खाण्यावर प्रेम करणारे लोक स्वत:च्या जीभेचे लाड पुरवत असतात. खास नॉन व्हेज खाण्यासाठी ते विविध हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये चक्कर टाकत असतात. नॉन व्हेज प्रेमींच्या फेवरेट पदार्थांमध्ये कलेजी पाव हा पदार्थ हमखास येतो. मटणाची कलेजी ही शरीरासाठी खूप आरोग्यदायी असते. कलेजी पाव हा प्रकार शहरांमध्ये खूप फेमस आहे. हा लोकप्रिय पदार्थ प्रामुख्याने फास्ट फूड म्हणून खाल्ला जातो. पण घरच्या घरी देखील कलेजी तयार करता येते. लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातील कलेजीची सोपी रेसिपी वाचून तुम्ही हा चविष्ट पदार्थ घरी बनवू शकता.
साहित्य :
- अर्धा किलो कलेजी
- चार-पाच बारीक चिरलेले कांदे
- अर्धी वाटी मटणाचे वाटण
- अर्धा चमचा हळद
- एक-दोन चमचे मटण मसाला
- एक मोठा चमचा तेल
- एक चमचा गरम मसाला
- एक तमालपत्र
- दोन लवंगा
- पाव चमचा हिंग
- एक मोठा चमचा तूप
कृती :
- कलेजी स्वच्छ धुवून त्याला हळद, मीठ, सी.के.पी. मसाला आणि मटणाचे वाटण लावून ठेवा.
- गॅसवर पातेल्यात तेल व तूप टाकून गरम करायला ठेवा.
- त्यामध्ये हिंग, तमालपत्र, लवंगा घाला. पुढे कांदा घालून ते मिश्रण परतून घ्या.
- झाकण ठेवून वाफ आणा. दोन्ही हातात रुमालाने पातेलं धरुन हडसा. (टॉस करा.)
- गॅसची आंच मंद करुन पातेल्यावर झाकणात पाणी घालून शिजवून घ्या..
- नंतर गरम मसाला घाला. कलेजी शिजल्यावर थोडंसं पाणी घाला.
आणखी वाचा – Prawns Rice: घरच्या घरी झणझणीत कोळंबी भात बनवायचाय? पटकन नोट करा सोपी रेसिपी
(कलेजी प्रामुख्याने पावासह खाल्ली जाते. काही ठिकाणी लोक ब्रेड आणि कलेजी खातात. तर काहींना कलेजीबरोबर भाकरी, चपाती खायला आवडते.)