Kanda Kakdi Koshimbir : जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी आपल्यापैकी अनेकांदा लोणचं, चटणी किंवा कोशिंबीर खायला आवडते. आज आम्ही तुम्हाला अशीच एक रायत्याची रेसिपी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही दुप्पट जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. काकडी कांद्याचे स्वादिष्ट रायते तुम्ही झटपट घरी बनवू शकता. त्यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :

  • काकड्या
  • कांदे
  • दही
  • हिरव्या मिरच्या
  • लाल तिखट
  • मिरेपूड
  • जिरेपूड
  • साखर
  • मीठ
  • कोथिंबीर

हेही वाचा : कुरकुरीत मंच्युरियन घरी कसे बनवावे? जाणून घ्या ही सोपी रेसिपी

कृती :

  • काकड्या व कांदे सोलून घ्या आणि बारीक चिरुन घ्या.
  • दही चांगल्याने घुसळून घ्या.
  • मिरच्या उभ्या चिरा.
  • दह्यात बारीक चिरलेले पदार्थ टाका.
  • त्यात तिखट, साखर आणि चवीनुसार मीठ टाका.
  • सर्व एकत्रित करा आणि या मिश्रणात वरुन जिरेपूड, मिरेपूड आणि वरुन कोथिंबीर घाला.
  • काही वेळ हे रायते फ्रीजमध्ये ठेवा आणि सर्व्ह करताना थंडगार रायत्याचा आस्वाद घ्या.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kanda kakdi koshimbir or raita recipes how to make kanda kakdi raita healthy food ndj
Show comments