Kanda Zunka Recipe Video : झुणका भाकर हा महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. झुणका भाकर बनवायला सणावाराची नाही तर मूडची आवश्यकता असते. जेव्हा मूड असेल तेव्हा तुम्ही झुणका भाकर बनवून खाऊ शकता. तुम्ही कधी कांद्याचा झुणका खाल्ला आहे का? झणझणीत असा कांद्याचा झुणका चवीला अप्रतिम वाटतो. हा झुणका बनवायलाही तितकाच सोपा आहे. आज आपण कांद्याचा झुणका कसा बनवायचा, याविषयी जाणून घेणार आहोत. (Kanda Zunka Recipe how to make Maharashtrian dish kandyacha zunka watch video and note down recipe)
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कांद्याच्या झुणक्याची एक रेसिपी सांगितली आहे.

कांद्याचा झुणका कसा बनवावा? (Recipe : How to Make Kandyacha Zunka )

या व्हायरल व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे –

makar sankranti 2025 til gul ladoo recipe in marathi easy til ladoo recipe for sankranti
तिळगुळ घ्या गोड गोड बोला! ‘या’ मकरसंक्रांतीला बनवा परफेक्ट तिळाचे लाडू, लिहून घ्या सीक्रेट रेसिपी
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी
Makar sankranti 2025 special bhogi bhaji recipe in marathi and health benefits everyone should know
“भोगीची भाजी” एकदम चमचमीत आणि पारंपारिक रेसिपी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Savlyachi Janu Savli
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांचा ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “तुम्ही किती…”
crispy twister recipe
Crispy Twister Recipe: कुरकुरीत आणि चवदार खायचंय? मग बटाट्याची ‘ही’ रेसिपी ट्राय कराच
crunchy potato recipe in marathi
Crunchy Potato Kachori: बटाट्याची खुसखुशीत कचोरी कधी खाल्ली आहे का? मग रेसिपी पटकन वाचा
Tasty Bread Paratha
उरलेल्या ब्रेडपासून बनवा टेस्टी ब्रेड पराठा; झटपट होणारी रेसिपी लगेच वाचा

साहित्य

  • बेसन पीठ
  • दोन चमचे तेल
  • जिरे
  • मोहरी
  • पातळ उभा चिरलेला कांदा
  • मिरची
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • आलं लसुण पेस्ट
  • टोमॅटो
  • धनेपूड
  • जिरेपूड
  • मीठ
  • हळद
  • तिखट
  • पाणी

हेही वाचा : Diwali Special Protein Laddoos : यंदा दिवाळीत बनवा भरपूर प्रोटीन असणारे लाडू, फक्त ‘या’ चार बिया अन्…; तुमचे लाडू झटपट तयार

कृती

  • एक कढई गॅसवर ठेवा
  • या कढईत दोन चमचे तेल टाका
  • तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे आणि मोहरी टाका. त्यानंतर कढीपत्ता टाका.
  • त्यानंतर बारीक उभा चिरलेला कांदा व बारीक चिरलेली हिरवी मिरची टाका.
  • नीट परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात आलं लसणाची पेस्ट टाका.
  • नीट परतून घ्या व त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाका.
  • त्यानंतर त्यात धनेपूड, जिरेपूड, मीठ, हळद आणि तिखट टाका.
  • थोडं बेसन पीठ टाका आणि नीट एकत्रित करा.
  • नीट परतून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाका आणि परतून घ्या.
  • त्यानंतर कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटे शिजवून घ्या.
  • शेवटी कोथिंबीर टाकून कांद्याचा झुणका तयार होईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ ( Viral Video)

हेही वाचा : कच्ची पपई खाल्याने आरोग्याला होतील चमत्कारी फायदे; कच्च्या पपईची भाजी गृहिणींनो एकदा नक्की ट्राय करा

diplakshmi123 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कांदयाचा झुणका” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप सोपी रेसिपी. आमच्यासारख्या लोकांना, जे बाहेर देशात राहतात त्यांना बनवायला सोपी आहे ही.” तर एका युजरने लिहिलेय, “मला पण खूप आवडते अस खायला” आणखी एका युजरने लिहिलेय, “बेसन भाजून केलं तर अजून छान बनतं.”

Story img Loader