लहान मुलेच काय पण कारल्याच्या भाजीचे नाव ऐकून मोठे देखील नाक मुरडतात. पण जर तुम्हाला बाजारात ताजी कारली मिळाली तर नक्कीच घरी आणा आणि अशा प्रकारे तयार करा आणि कारल्याचे वडे करा. लहान मुले कारले खात नाही. अशा प्रकारे वडे करून, त्यातून मुलांना खाऊ घालू शकतो.नक्की करून बघा. तुम्हालाही नक्कीच आवडतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारलं म्हंटलं की लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येजण नाक मुरडतो. कारले चवीला कडू असल्याने बऱ्याच जणांना ते आवडत नाही. कारले चवीला जरी कडू असलं तरी आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर असत. कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट, फ्लेव्होनॉईड्स आणि इतर पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या अनेक आरोग्य समस्या सहज दूर होतात. ज्यांना फिट राहायचं आहे त्यांच्यासाठी तर कारल्याशिवाय कोणताही डाएट प्लॅन अपूर्णच ठरेल. कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच.. असं तुमच्याही रेसिपीत होतंय का? मग ही एक चटकदार रेसिपी नक्की ट्राय करा. 

कारल्याचे वडे साहित्य

१/२ कप हरबरा डाळ
२ मध्यम आकाराची कारली
१ लहान कांदा
थोडी कोथिंबीर
३-४ हिरव्या मिरच्या
५-६ लसूण पाकळ्या
१/२ इंच आले
१ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
१/४ टीस्पून हिंग
१/२ टीस्पून जिरे पावडर
१ टीस्पून धने पावडर
चवीप्रमाणे मीठ
१/२ लिंबू
तळण्यासाठी तेल

कारल्याचे वडे कृती

१. सर्वात आधी डाळ स्वच्छ धुऊन, रात्रभर भिजत ठेवणे किंवा सात-आठ तास तरी डाळ भिजली पाहिजे. कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घेणे. कारले उभे चिरून त्यातील सर्व बिया काढून घेणे. किसनीने किसून घेणे.हे वडे टोमॅटो केचप,हिरवी चटणी याबरोबर किंवा नुसते ही खाऊ शकतात.

२. डाळीचे वाटलेले मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणे. त्यात चिरलेला कांदा, कोथिंबीर, मीठ व सर्व मसाले घालून घेणे. व्यवस्थित मिक्स करणे. वरून अर्धा लिंबू पिळून घेणे.

३. गॅसवर कढईत तेल घालून तापत ठेवणे. गॅस मध्यम आचेवर ठेवावा.हव्या त्या आकाराचे वडे,छोटासा गोळा घेऊन, हातावर थापून घेणे. कढईत बसतील तेवढे वडे घालून घेणे.दोन्ही बाजूने छान लालसर तळून घेणे.

हेही वाचा >> लठ्ठपणा दूर करून तुमची स्लिम फिगरची इच्छा पूर्ण करेल कमळाची काकडी; नोट करा सोपी मराठी रेसिपी

४. अशाप्रकारे सर्व वडे व्यवस्थित तळून घेणे. हे वडे टोमॅटो केचप,हिरवी चटणी याबरोबर किंवा नुसते ही खाऊ शकतात.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karale recipe karalyache vade recipe in marathi bitter gourd recipe srk
Show comments