दीपा पाटील
साहित्य
* १ वाटी ओली करंदी, १ वाटी चणाडाळ, १ कांदा, १ चमचा आले-लसूण वाटलेले, थोडा कढीपत्ता, २ हिरव्या मिरच्या, २ चमचे तांदळाचे पीठ, मीठ, तेल.
कृती :
ओली करंदी कोस काढून स्वच्छ धुऊन घ्यावी. चणाडाळ रात्रभर भिजवून नंतर मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावी.कांदा, मिरची, कढीपत्ता छान बारीक चिरून घ्यावे. चणाडाळीमध्ये ते घालावे. सोबतच आले-लसूण वाटण, तांदळाचे पीठ, मीठ घालून मिश्रण तयार करावे. त्याचे लहान लहान वडे करून तळावेत.