Karanji recipe: दिवाळीचा फराळ करण्याची वेळ झाली आहे. महिलांनी एक एक पदार्थ करायला सुरुवात केली असून आज आम्हीही तुमच्यासाठी एक फराळाचा खास पदार्थ घेऊन आलो आहोत. चला तर आज जाणून घेऊयात खुसखुशीत करंजीची रेसिपी.

फराळातला करंजी हा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो. त्याची रेसिपी भारतभर वेगेवगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते. त्यात करंज बनवणं म्हणजे अतिशय नाजूक काम. पण चिंता करु नका अतिशय सोप्या पद्धतीत आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग सुरु करुयात….

Diwali faral recipe marathi Chakali bhajani recipe in marathi diwali faral in marathi
Chakli Recipe: दिवाळीत खमंग आणि कुरकुरीत चकलीसाठी भाजणीचे योग्य प्रमाण; वाचा परफेक्ट रेसिपी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Diwali Faral Recipe Shankarpale
Diwali Faral Recipe : तोंडात टाकताच विरघळेल अशी खुसखुशीत बिस्किट शंकरपाळी! जाणून घ्या सोपी रेसिपी
bhajaniche rolls
Diwali Faral Special : खुसखुशीत भाजणी रोल! या दिवाळीत बनवा बनवा हटके रेसिपी
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड

करंजी साहित्य

३ वाटी सूखे खोबरे किसून घ्यावे
३ वाटी बारीक रवा
२.२/५ वाटी पिठी साखर
२ टीस्पून वेलची पावडर
आवडीनुसार सुका मेवा
आवडीनुसार मनुका
तूप
१/२ किलो मैदा
चिमूटभर मीठ
आवश्यकतेनुसार पाणी
तेल तळण्यासाठी

करंजी कृती –

स्टेप १

कढई गॅसवर गरम करून घ्या, त्यामध्ये सूखे खोबरे भाजून घ्या, ३ ते ४ मिनिटे भाजून झाले की सर्व परातीमध्ये काढून घ्या. तसाच रवा पण भाजून घ्या. आता थोडे तूप घालून घ्या आणि त्यामध्ये सुका मेवा भाजून घ्या. सगळे एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतल्यानंतर आता त्यामध्ये पिठी साखर, वेलची पूड घालून घ्या आणि छान एकजीव करा.

स्टेप २

परतीत किंवा एका मोठ्या ताटात मैदा चाळून घ्या. ४ टेबलस्पून तूप गरम करून त्यावर घाला आणि छान मिक्स करून घ्या. सगळीकडे तूप लागेल असे मिक्स करून घ्या आणि पाण्याच्या मदतीने मळून घ्या. १/२ तास झाकण लावून ठेवून द्या.

स्टेप ३

आता पीठ परत थोडे मळून घ्या,आणि एक छोटा गोळा घेऊन पोळी लाटून घ्या,तयार सरण मध्ये ठेवून कडे ला पाणी लावून घ्या,आणि साचा ने करंजी कापून घ्या,अशाच प्रकारे सर्व पिठाच्या करंज्या करून घ्या.

हेही वाचा >> Chakli Recipe: दिवाळीत खमंग आणि कुरकुरीत चकलीसाठी भाजणीचे योग्य प्रमाण; वाचा परफेक्ट रेसिपी

स्टेप ४

आता कढई मध्ये तेल घालून गरम करून घ्या, त्या मध्ये एक एक करंजी सोडून स्लो गॅस वर तळून घ्या, दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या काढून घ्या,अशाच प्रकारे सर्व करंजी भाजून घ्या.हवा बंद डब्ब्या मध्ये ठेवा.

Story img Loader