Karle Appe Recipe In Marathi: कारले आप्पे घरच्या घरी बनवायची सोपी रेसिपी लिहून घ्या…

साहित्य

  • २ कप तांदुळ
  • 1/4 कप उडीद डाळ
  • 1 कप चुरमुरे
  • 1 कारल किसलेले
  • 1 कांदा बारीक चिरलेला
  • 1 टोमॅटो चीरलेला
  • 2 हिरवी मिरची
  • 1 टे. स्पुन चींच पेस्ट
  • १/२. टे. स्पुन साखर
  • चवी पुरते मीठ
  • 1/2 टे. स्पुन जीरे पावडर
  • कोथिंबीर
  • 2 टे. स्पुन तेल
  • 1/2 टे. स्पुन जीरे
  • ४-५ कडीपत्ता

कृती

प्रथम उडीद डाळ व तांदुळ ५ तास पाण्यात भिजवून मिक्सर मधुन बारीक करुन घ्यावे.व कारले कीसुन घ्यावे.

अेका पॅन मधे तेल घालुन त्या मधे कांदा व मिरची परतुन घ्यावी.व नंतर कीसलेले कारले घालुन परतुन घ्यावे.नंतर त्या मधे चींच पेस्ट व साखर घालुन मिक्स करावे व पीठा मधे मिक्स करावे.टोमॅटो व कोथिंबीर,मीठ घालावे.

चुरमुरे भिजवुन मिक्सर मधे बारीक करावे व पीठा मधे मिक्स करावे.जीरे पुड घालावी व चांगले मिक्स करुन घ्यावे. आप्पेपात्र गरम करुन त्या मधे तेल घालुन बॅटर घालावे वर झाकन ठेवावे व पुन्हा दुसऱ्या बाजुने पलटुन घालावे. तयार आहे कारल्याचे टेस्टी व हेल्दी आप्पे. चटणी बरोबर सर्व्ह करावे.

खोबर मीरची चटणी व कारले आप्पे.

Story img Loader