चिवडा म्हणजे लहान मुलांचाच काय पण अगदी मोठ्या माणसांचाही विक पाॅईंट. दुपारी ४ वाजता टी टाईम झाला की काहीतरी तोंडात टाकावेसे वाटते. अशा वेळी चिवडा नेहमी हाताशी असायलाच हवा.. पाहूणे आले आता ऐनवेळी झटपट काय करायचे, अशा विचारात असताना घरात अगदी तय्यार असणाऱ्या चिवड्याचा मोठाच आधार होतो. मुलांना स्नॅक्ससाठी डब्यात द्यायलाही चिवडा अगदी उपयुक्त ठरताे. असा हा सगळ्यांना हवाहवासा वाटणारा चिवडा. पण तुम्ही कधी कारले कांदा कुरकुरे चिवडा खाल्लाय का? नाही ना, मग ही घ्या भन्नाट रेसिपी

कारले कांदा कुरकुरे चिवडा साहित्य

Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
How To Make Crispy Roti Chinese Bhel In Marathi
Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Husband picking up wife and play game see waht happend next funny video goes viral
“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती

१/२ वाटी कारले चिप्स सुकवलेले)
१/४ वाटी कांदे चिप्स सूकवलेले
१/४ वाटी शेंगदाणे आणि काजू
१ टेबलस्पून हळद,लाल मिरची चाट मसाला,आमचूर पावडर,धणे जीरे
१/४ टेबलस्पून चिवडा मसाला (ऑप्शनल)
मनुके (ऑप्शनल)
कडीपत्ता
काळ मीठ चवीनुसार,पिंक सॉल्ट
१/४ वाटी तेल
१मटीस्पून लसूण पावडर
१ टेबलस्पून राई
२ सुक्या लाल मिरच्या

कारले कांदा कुरकुरे चिवडा कृती

१. प्रथम तेल गरम करावे आणि नंतर मंद आचेवर कारले कांदा चीप्स तळून घ्यावेत, आणि नंतर काजू, शेंगदाणे तळून घ्यावेत.

२. आता फोडणीसाठी पसरट टोपात गरम तेल दोन चमचे घेऊन तेल गरम करावे. नंतर प्रथम राई फोडणीला घालून तडतडली की त्यात कडीपत्ता लाल मिरच्या घालून छान परतून घ्यावे.

३. नंतर त्यात तळून ठेवलेले कारले, काजू, शेंगदाणे घालावे आणि नंतर त्यात सगळे मसाले घालून हलवून घ्यावे.

हेही वाचा >> मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या घाईत झटपट बनवा शेव पराठा; ही घ्या सोपी मराठी रेसिपी

४. अगदी शेवटी मीठ, लसूण पावडर, कांदे घालून हलवून घ्यावे (कांदे चिप्स जास्त हलवू नका कारण ते फार हलके असतात) अशाप्रकारे आपला टेस्टी चिवडा तयार आहे. एअर टाईट किंवा काचेच्या बरणीत हा चिवडा भरून ठेवावे.