कारलं म्हंटलं की लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येजण नाक मुरडतो. कारले चवीला कडू असल्याने बऱ्याच जणांना ते आवडत नाही. कारले चवीला जरी कडू असलं तरी आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर असत. कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट, फ्लेव्होनॉईड्स आणि इतर पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या अनेक आरोग्य समस्या सहज दूर होतात. ज्यांना फिट राहायचं आहे त्यांच्यासाठी तर कारल्याशिवाय कोणताही डाएट प्लॅन अपूर्णच ठरेल. कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच.. असं तुमच्याही रेसिपीत होतंय का? मग ही एक चटकदार रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर जाणून घेऊयात कशी बनवायची कारल्याची चटणी.

कारल्याची चटणी साहित्य

young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Paneer Schezwan Dry Recipe
स्टार्टर्ससाठी घरच्या घरी ट्राय करा ‘पनीर शेजवान ड्राय’ रेसिपी, वाचा साहित्य आणि कृती

१. कारले – ३ (किसून बारीक करुन घेतलेले)
२. तेल – १ टेबलस्पून
३. जिरं – १ टेबलस्पून
४. हिंग पावडर – १/४ टेबलस्पून
५. शेंगदाणे – २ टेबलस्पून (जाडसर भरडून घेतलेले)
६. खोबर – १/२ कप
७. तीळ – १ टेबलस्पून
८. हळद – १/४ टेबलस्पून
९. लाल मिरची पावडर – १, १/२ टेबलस्पून
१०. साखरेची पावडर – २ टेबलस्पून (साखर हलकेच मिक्सरला लावून त्याची पावडर करावी.)
११. लिंबाचा रस – २ टेबलस्पून
१२. मीठ – चवीनुसार
१३. चाट मसाला – १/४ टेबलस्पून

कारल्याची चटणी कृती

१. सर्वप्रथम कारल्याचे लहान तुकडे कापून ते काही काळासाठी मिठाच्या पाण्यात भिजत ठेवावेत. जेणेकरून कारल्याचा कडूपणा चटणीत उतरणार नाही. त्यानंतर कारल्याच्या लहान तुकड्यांचा किसणीवर किसून किस तयार करुन घ्यावा.

२. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जिरं, हिंग, किसून बारीक केलेले कारले घालावे. हे सगळे जिन्नस गरम पॅनमध्ये ८ ते १० मिनिटे व्यवस्थित भाजून घ्यावेत. (कारल्यातील पाण्याचा अंश संपूर्ण निघून जाईपर्यंत पॅनमध्ये कारल्याचा किस भाजून घ्यावा.)

३. आता या मिश्रणात जाडसर भरड करुन घेतलेले भाजलेले शेंगदाणे, किसून घेतलेल खोबर, तीळ, हळद, लाल मिरची पावडर, साखरेची पावडर, लिंबाचा रस घालावेत.

हेही वाचा >> Carrot Smoothie: मुले गाजर खात नसतील तर बनवा स्मूदी, दृष्टी वाढण्यास होईल मदत

४. त्यानंतर सगळ्यांत शेवटी यात चवीनुसार मीठ व चाट मसाला घालावा. चमच्याच्या मदतीने कारल्याची सुकी चटणी व्यवस्थित एकजीव करुन घ्यावी.