कर्टुल्यांची ही रानभाजी आवश्य खावी. कारण या भाजीचे आपल्या शरीराला खुप फायदे होतात. या भाजीत फायबर आणि अॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. भाजी पचायलाही हलकी असते. पावसाळ्याच्या दिवसात इंफेक्शनचा धोका, बद्धकोष्ठता, पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी मदत होते. शरीरातील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी मदत करते. कॅन्सर, हृदयविकाराचा धोका कमी करण्यासही मदत होते. मधुमेहींसाठी कर्टुली खुप फायदेशीर असून रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तसेच वातावरणात बदल झाल्याने कफ, सर्दी, खोकला इतर अॅलर्जीचा त्रास कमी होण्यास मदत होते. अशा बहुगुणी कर्टुल्याची भाजी कशी बनवायची चला बघुया रेसिपी
कर्टुल्यांची सुक्की रानभाजी साहित्य
- १०० ग्राम करटुली उभीपातळ चिरलेली
- २ मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरलेले
- २-४ मिरच्या
- १ टिस्पुन जीरे
- १/४ टिस्पुन हळद
- १/४ टिस्पुन तिखट
- २-३ टेबलस्पुन ओलेखोबरे
- चविनुसार मीठ
- १ टेबलस्पुन तेल
कर्टुल्यांची सुक्की रानभाजी कृती
स्टेप १
कर्टुली स्वच्छ धुवुन पातळ उभी चिरून ठे वा. कांदे उभे चिरून ठेवा. ओले खोबरे जाडसर वाटुन घ्या मिरच्या कट करून ठेवा.
स्टेप २
कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जीरे, मिरची मिक्स करून परता नंतर त्यात उभा चिरलेला कांदा मिक्स करून चांगला परता थोडे मीठ, हळद, तिखट मिक्स करून परता
स्टेप ३
नंतर त्यात चिरलेली कर्टुली टाका व परता नंतर झाकण ठेवुन२-४ मिनिटे शिजवा.
स्टेप ४
शिजलेल्या भाजीत शेवटी ओले खोबरे मिक्स करून परता आपली कर्टुलयाची भाजी रेडी.
हेही वाचा >> खानदेशी पद्धतीने करा आंबट चुक्याची पातळ भाजी; भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवी ही रेसिपी
काचेच्या वाटी मध्ये भाजी सर्व्ह करा