डॉ. सारिका सातव
साहित्य
* गव्हाचे पीठ २-३ वाटय़ा, चिरलेला कोबी, गाजर, कांद्याची पात, सिमला मिरची आणि वाटाणा, लाल तिखट, मीठ, चाट मसाला, तीन चमचे तेल.
कृती
* गाजर, वाटाणा, सिमला मिरची, कांदा या भाज्या मीठ, लाल तिखट आणि चाट मसाला घालून शिजवाव्यात.
* सर्वात शेवटी कोबी घालून एक वाफ द्यावी.
* नंतर कांद्याची पात घालावी.
* गव्हाच्या पिठात मीठ, तेल घालून मळून घ्यावे.
* फुलक्याप्रमाणे लाटावेत.
* त्यावर भाज्यांचे सारण एका सरळ रेषेत ठेवून घट्ट गुंडाळावे.
* सारण बाहेर येऊ नये म्हणून दोन्ही बाजू बंद कराव्यात.
* हा रोल कमी तेलात तळावा.
* तुकडे करून किंवा अख्खाच चटणी किंवा दह्य़ाबरोबर वाढावा.
वैशिष्टय़े
* डब्याला नेण्यासाठी उत्तम पदार्थ
* तंतुमय पदार्थ प्रथिने आणि ‘ब’ जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात मिळते.
* मधुमेह, हृदयविकार, स्थूलता आणि अन्य अनेक व्याधींमध्ये उपयुक्त.
* न आवडणाऱ्या भाज्याही यात वापरता येतात.
* अंडे, पनीर इत्यादींचाही वापर करता येतो.