निलेश लिमये

साहित्य

४ मोठे चमचे कैरीच्या पन्हाचा कोळ, अर्धा चमचा चाट मसाला, १ चमचा जिरे पूड, अर्धा लिटर प्यायचा सोडा, चिमूटभर वेलची पूड, चवीनुसार काळे मीठ, केसर स्वादानुसार.

कृती

एका भांडय़ात कैरीच्या पन्ह्य़ाचा कोळ घ्यावा. त्यात चाट मसाला, जिरे पूड, वेलची पूड, काळे मीठ आणि केसर घालून छान हलवून घ्यावे. यानंतर त्यात प्यायचा सोडा घालून थंडगार सव्‍‌र्ह करावे.

Story img Loader