Khajoor Halwa Recipe : पावसाळ्याच्या दिवसांत गरमागरम आणि चविष्ट काहीतरी खाण्याची मज्जाच वेगळी. त्यातही तुम्ही तयार करणार असलेला पदार्थ हेल्दी आणि टेस्टी असेल तर मग कॅलरीज वाढण्याची सुद्धा चिंता मिटेल. पावसाळा आपल्यासोबत अनेक आजार घेऊन येतो. या ऋतूमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत निरोगी राहण्यासाठी, लोकांना पावसाळ्यात अशा गोष्टींचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे, ज्या खाल्ल्याने त्यांची प्रतिकारशक्ती वाढू शकते. अशाच एका पदार्थाचे नाव आहे खजूरचा हलवा. चला तर पाहुयात कसा बनवायचा खजूरचा हलवा.
खजूर हलव्यासाठी लागणारे साहित्य
- २०० ग्रॅम खजूर
- १ कप दूध
- १ १/२ कप पिठी साखर
- १/४ कप तूप
- १०० ग्रॅम काजू
- १/४ टीस्पून वेलची पावडर
खजूर हलव्यासाठी कृती
- खजूराचा हलवा बनवण्यासाठी प्रथम एका पातेल्यात दूध आणि खजूर उकळा. यानंतर गॅस कमी करून दूध घट्ट होईपर्यंत ते चांगले शिजवा.
- आता त्यात तुपात तळलेले काजू घाला. जेव्हा हे खजूरचे दूध घट्ट होऊ लागेल तेव्हा त्यात साखर, तूप घाला.
- खजुराचे दूध आटून पॅनची कडा सोडू लागल्यावर त्यात वेलची पूड टाका आणि मिक्स करा.
हेही वाचा – Monsoon recipe: पावसाळ्यात घ्या गरमा गरम कोबी-पोह्यांचा आनंद, जाणून घ्या रेसिपी
- आता एका भांड्याला तूप लावून ग्रीस करून त्यात हे मिश्रण टाकून सेट करायला ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर तुमच्या आवडत्या आकारात कापून सर्व्ह करा.