काळा मसाला हा सर्वप्रथम खानदेशमध्ये बनवण्यात आला होता आणि हा मसाला त्या ठिकाणी कोणत्याही तिखट भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. काळा मसाला हा मुख्यता आमटी मध्ये किंवा सांबर मध्ये घातला जातो आणि त्याची चव वाढवली जााते. चला तर पाहुयात अस्सल झणझणीत खानदेशी काळा मसाला सोपी रेसिपी..
खानदेशी काळा मसाला साहित्य
- सुक खोबरं पाव किलो धणे पाव किलो
- मिरी २५ ग्रॅम
- लवंग ६ ग्रॅम दालचिनी १२ ग्रॅम
- बदाम फूल १२ ग्रॅम नाकेश्र्वर ६ ग्रॅम
- सुंठ १२ ग्रॅम रामपत्री १२ ग्रॅम
- जायपत्री १२ ग्रॅम हिरवी वेलची ६ ग्रॅम
- शहाजीरे १२ ग्रॅम जिरे २५ ग्रॅम
- बडीशेप १२ ग्रॅम तेज पत्ता १२ ग्रॅम
- दगड फूल १२ ग्रॅम मसाला वेलची ६ ग्रॅम
- हिंग २५ ग्रॅम हळद २५ ग्रॅम
- जायफळ अर्धे
- खसखस २५ ग्रॅम
खानदेशी काळा मसाला कृती :
- सर्वात आधी वर दिलेलं सर्व साहित्य वेगवेगळं छान भाजून घ्या. यावेळी तेल वापरु नये. खोलगट कढईत हे सर्व साहित्य खमंग भाजून घ्या.
- सर्व मसाले भाजल्यानंतर ते थंड होण्यासाठी एका पेपरवर पसरवून घ्या.
- सर्व मसाले थंड झाल्यानंतर मिक्सररमध्ये बारिक करुन घेणे. मिक्सरला मसाले बारीक करुन झाल्यावर चाळणीनं चाळून घ्यायचे आहेत.लक्षात ठेवायचं आहे की खोबरं वेगळ बारीक करुन बाजूला ठेवायचं आहे.
- मसाले चाळून झाल्यानंतर खोबरं बारीक करायचं आहे. खोबऱ्याला बऱ्यापैकी तेल सुटत असल्यामुळे खोबरं बारीक केल्यावर ते पातळंस होतं.
हेही वाचा >>
- आता खोबरं आणि बारीक केलेली मसाला पावडर हातानं छान एकत्र एकजीव करुन घ्या
- हा मसाला एका स्वच्छ बरणीत भरुन ठेवल्यास वर्षभर चांगला राहतो. तुम्हीही हा मसाला नक्की ट्राय करा.