Khandeshi Kala Mutton soup: ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या, त्यालाच अनुरूप झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण. अशीच एक झणझणीत रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहोत. चला तर पाहुयात आज खानदेशी स्पेशल झणझणीत काळ मटण सूप रेसिपी. हे खान्देशी पद्धतीचं मटण तुम्ही एकदा खाल तर खातच रहाल. चला तर पाहुयात याची सोपी रुचकर रेसिपी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खान्देशी परफेक्ट काळ मटण सूप साहित्य

  • पाव किलो मटण
  • बारीक चिरलेला कांदा
  • आले, मीठ
  • हळद, मिरी पावडर
  • जिरे

खान्देशी परफेक्ट काळ मटण सूप कृती

  • सर्वात आधी एका एका कुकरमध्ये फोडणीसाठी तेल टाकून घ्या.
  • यानंतर तेलात लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्या, त्यात हळद टाका.
  • वरुन आलं किसून टाका, मिरी पावडर, जिरे टाका आणि एकजीव करा.
  • त्यानंतर यावर मटण टाका आणि सर्व एकत्र करुन घ्या.
  • मटण शिजत आल्यावर त्यावर मीठ आणि पाणी टाका.
  • यानंतर कुकरच झाकण लावून घ्या, ४, ते ५ शिट्ट्या करुन घ्या. त्यानंतर कुकर थंड हाऊद्यात.

हेही वाचा >> थंडीसाठी आता घरीच बनवा बहु्गुणी मोरावळा; या पद्धतीने केलेला मोरावळा वर्षभर टिकेल, ही घ्या सोपी रेसिपी

  • अशाप्रकारे आपलं खान्देशी पद्धतीचं परफेक्ट काळ मटण सूप रेडी आहे.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khandeshi kala mutton soup recipe in marathi mutton soup easy recipe in marathi srk
Show comments