खानदेश… नाव उच्चारताच सर्व प्रथम आठवते आपली बहिणाबाई आणि तिच्या साध्या सहज पण अत्यंत भावस्पर्शी कविता. अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके, तेंव्हा मिळते भाकर…याच खानदेशच्या वेगवेगळ्या रेसिपी आपण आतापर्यंत पाहिल्या आहेत. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी आणखी एक रेसिपी घेऊन आलो आहोत. कढी रेसिपी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र आज करुयात.. खानदेशी लसुणी कढी रेसिपी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लसुणी कढी साहीत्य

  • १/२ लीटर आंबट ताक
  • ३-४ हिरव्या मिरच्या
  • ४-५ लसुण कळ्या
  • १/२ ईंच आले
  • ५-६ कढीपत्याची पाने
  • १/२ चमचा हिंग
  • १/४ चमचा हळद
  • २ सुक्या लाल मिरच्या
  • २ चमचे बेसन
  • १/२ चमचा जीरे
  • १/२ चमचा मोहरी
  • तेल
  • मीठ
  • कोथिंबीर

लसुणी कढी कृती

स्टेप १

प्रथम कढईत तेल गरम करुन त्यात जीरे,मोहरी,कढीपत्ता,हिंग,आले आणि ठेचलेला लसुण घालुन फोडणी करा.मग घुसळलेले ताक घाला.चविनुसार मीठ घाला आणि कढी छान उकळु द्या.

स्टेप २
कढी झाल्यावर त्यावर छान लसुण आणि लाल सुक्या मिरचीचा तडका द्या.आता कढी तयार आहे.

हेही वाचा >> टम्म फुमलेले खानदेशी उडीद वडे बनविण्याची खास पद्धत; लगेच नोट करा सोपी रेसिपी

स्टेप ३
आता कढी आणि भात किंवा चपातीसोबत खाऊ शकता.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khandeshi lasuni kadhi recipe in marathi khandeshi recipes in marathi srk
Show comments