सतत त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. अशावेळी रोज वेगळं आणि तरीही चविष्ट काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडतो. विकेंडला तर काहीतरी वेगळं आणि चमचमीत हवं असतं. अशातच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अस्सल खान्देशी मसाला खिचडी, चला तर पाहुयात याची सोपी मराठी रेसिपी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खान्देशी मसाला खिचडी साहित्य

  • १ कप तांदूळ
  • १/२ कप तूरडाळ
  • १ टेबलस्पून लाल मिरची पावडर
  • १ टेबलस्पून काळा मसाला
  • १ टेबलस्पून धनाजीरा पावडर
  • चवीनुसार मीठ
  • १ बटाटा फोडी करुन
  • १/4 कप शेंगदाणे
  • १ कांदा बारीक चिरुन
  • २-३ लसूण पाकळ्या बारीक चिरुन
  • ३ कप गरम पाणी

खान्देशी मसाला खिचडी कृती

स्टेप १

प्रथम तांदूळ व डाळ स्वच्छ २/३ वेळा धुवावेत. कांदा व लसुण बारीक चिरुन घ्यावेत. बटाट्याच्या फोडी करुन घ्यावेत. फोडणी करुन त्यात दाणे, कांदा व लसूण परतावी.

स्टेप २

मग त्यात बटाटे परतावेत. मग त्यात भिजवलेले तांदूळ व डाळ परतावी. मग त्यात मीठ व सर्व मसाले घालावेत व एकत्र करावे.

हेही वाचा >> सिंहगड स्टाईल लोकप्रिय कांद्याची झणझणीत चटणी; ही रेसिपी लगेच नोट करा

स्टेप ३

मग त्यात ३ कप गरम पाणी घालून इंनस्टंट पॅाटला १२ मिनिटे शिजवावे. गरम गरम खिचडी तयार. कढी, पापड सोबत सर्व करावी.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khandeshi masala khichdi recipe in marathi khandeshi recipe srk