जेव्हा येतो भाजी बनवायचा कंटाळा, नकोसे वाटते वांग,बटाटा,काकडी अन मुळा..खावंसं वाटत काही झटकन होणारे आणि हलकं फुलकं, तेव्हा जरूर बनवून पहा “खानदेशी पद्धतीने करा गवारीची गावरान मसालेदार रस्सा भाजी ”..चला तर पाहुयात, भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा खानदेशी पद्धतीने करा गवारीची गावरान मसालेदार रस्सा भाजी ..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गवारीची गावरान मसालेदार रस्सा भाजी साहित्य

  • २५० ग्रॅम गवार
  • १ वाटी शेंगदाणे कूट
  • ५-६ तिखट हिरव्या मिरच्या
  • ८-१० लसूण पाकळ्या
  • जीरे
  • १ टेस्पून थणे पावडर
  • हिंग
  • हळद
  • चवीनुसार मीठ

गवारीची गावरान मसालेदार रस्सा भाजी कृती

स्टेप १
गवार बारीक तोडून स्वच्छ धुऊन एका पातेल्यामध्ये पाणी टाकून शिजवून घ्यावी. बाकीचे साहित्य जमा करणे हिरव्या मिरच्या तव्यावर थोडासे भाजून घेणे तयार शेंगदाण्याचा कुट तयार नसेल तर शेंगदाणे ही भाजून घ्यावे

स्टेप २
लसूण हिरवी मिरची कोथिंबीर मिक्सर च्या भांड्यात घेऊन सर्व वाटून घेणे त्यानंतर शेंगदाण्याचा कूट ही त्यामध्ये एकदा फिरवून घेणे. कढई मध्ये दोन-तीन चमचे तेल तापवून घ्यावे. त्यामध्ये जीरे हिंग धने पूड हळद टाकावे.

स्टेप ३
आता त्यामध्ये लगेच वाटलेला मसाला घालावा तो चांगला परतला की त्यामध्ये उकडलेली गवार घालावी व ते सर्व नीट मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते भाजीत टाकावे. तुम्हाला हवे तेवढे पाणी भाजीत घालावे. चवीनुसार मीठ घालावे.

हेही वाचा >> हिवाळ्यात घरीच बनवा कोकणी पद्धतीचं तिळकूट; विविध भाज्यांमध्ये घालून चव वाढवा

स्टेप ४
भाजी अजून सात ते आठ मिनिटे शिजवून घ्यावी. झणझणीत अस्सल खान्देशी दाणे लावून गवारीची भाजी तयार आहे.

पोटाच्या समस्यांपासून मिळतो आराम

गवारच्या शेंगा खाल्ल्याने अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्या दूर होतात. आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास, आहारात गवारीच्या शेंगांचा समावेश करा. त्यातील फायबर आपल्याला बद्धकोष्ठतेपासून मुक्त करेल. याचे नियमित सेवन केल्याने पाचन तंत्र मजबूत होते. गवारीच्या शेंगा नियमित खाल्ल्याने पोट स्वच्छ राहते.

त्वचेच्या समस्या दूर करण्यात लाभदायी

गवारीची भाजी त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करते. यासाठी गवारीच्या भाजीचा रस करून त्याचे सेवन केल्याने फायदा होतो.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khandeshi recipe gavarichi bhaji in marathi dane laun gavarachi bhaji recipe in marathi srk
Show comments