महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. तोच न्याय खाद्यसंस्कृतीलाही लागू होतो. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण. मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, लोणची, पापड, भजे, बोन्डे यांचे अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात. चला तर मग आज बनवुया खानदेशी पद्धतीचे खानदेशी दशमी आणि चटणी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खानदेशी दशमी चटणी साहित्य

१/२ वाटी ज्वारीचे पीठ
१/२ वाटी कणीक
१/२ वाटी कच्चे शेंगदाणे
१० लसूण पाकळ्या
१/४ टीस्पून जीरे
५ हिरव्या मिरच्या
१/४ टीस्पून हळद
१ टेबलस्पून तेल
मीठ स्वादानुसार

खानदेशी दशमी चटणी कृती

सर्वप्रथम लसूण पाकळ्या सोलून घ्या.मिरचीचे तुकडे करून घ्या.आता एका परातीत कणिक व ज्वारीचे पीठ एकत्र करा.

आता यात हळद मीठ व थोडे तेल घालून,याचा गोळा बनवून घ्या.आता हे दहा मिनिटे तसेच ठेवा.

आता या पिठाचे गोळे तयार करा.आता याची तेल लावून दशमी लाटावी.

आताही दशमी गरम तव्यावर दोन्ही बाजूनी चांगली शेकून घ्यावी. अशाप्रकारे सर्व दशम्या करून घ्याव्या.

हेही वाचा >> भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी

आता मिक्सर पॉटमध्ये कच्चे शेंगदाणे लसूण मिरची जीरे व मीठ घालून चांगले बारीक वाटून घ्या. यात आवश्यकतेनुसार पाणी घाला. आता ही चटणी दशमी सोबत वरून तेल घालून सर्व्ह करा. सोबत फोडलेला कांदा छान लागतो.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khandeshi recipe in marathi ddashmi chutni recipe in marathi chutni recipe in marathi srk