Khandeshi Bhaji Recipe: महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. तोच न्याय खाद्यसंस्कृतीलाही लागू होतो. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण. मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, लोणची, पापड, भजे, बोन्डे यांचे अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात. चला तर मग आज बनवुया खानदेशी मटकी वाटाणा रस्सा भाजी

खान्देशी मटकी वाटाणा रस्सा भाजी रेसिपी

soya chunks balls recipe in marathi
उद्याच्या नाश्त्यासाठी बनवा चवदार ‘सोया चंक्स बाॅल्स’, झटपट होणारी रेसिपी लिहून घ्या…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Boondi curry recipe in Marathi how to make Boondi curry recipe
रोज काय भाजी करावी सुचत नाही? घरात असलेल्या बुंदीची करा “बूंदी करी”; झक्कास होईल बेत
Tawa Prawn Masala Recipe In Marathi)
नॉनव्हेज प्रेमींसाठी खास ‘झणझणीत तवा प्रॉन्स मसाला’ रेसिपी, रविवारी बेत कराच…
matar kachori recipe in marathi
कुरकुरीत खायची इच्छा होतेय? मग लगेच बनवा ‘मटार कचोरी’, सोपी रेसिपी लिहून घ्या
Fried Modak Recipe
Modak Recipe : माघी गणेश जयंतीला फक्त १ वाटी गव्हाच्या पिठाचे बनवा कुरकुरीत ‘मोदक’; रेसिपी वाचा पटकन
Khandeshi Shev Bhaji Recipe In Marathi
अस्सल झणझणीत खानदेशी शेव भाजी, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी
Anda Masala Curry Recipe In Marathi
नॉन व्हेज प्रेमींसाठी खास रेसिपी! झणझणीत ‘अंडा मसाला करी’ आजच करा ट्राय, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी

१ कप मोड आलेली मटकी
१/२ कप मटार
१ कांदा उभा चिरून
१/४ कप सुके खोबरे
१ टेबलस्पून धणे
१ दालचिनी तुकडा
५ काळिमिरी
५ लवंगा
१ टीस्पून बडीशेप
१ टीस्पून शहाजीरे
१/२ जायपत्री
१ चक्रफूल
१ तमालपत्र
१ टेबलस्पून लाल सुकी मिरची
१ टीस्पून हळद
आलं‌ लसूण
तेल
मीठ चवीनुसार
१ टीस्पून तिखट आवडीनुसार
कोथिंबीर
१ टोमॅटो चिरलेला

खान्देशी मटकी वाटाणा रस्सा भाजी कृती

१. सर्वप्रथम मटकी, मटार स्वच्छ धूऊन घ्या. पॅनमधे थोडं तेल, हळद, कोथिंबीर, मटकी, वाटाणा, पाणी घालून १० मि. शिजू द्या.

२. पॅनमधे कांदा,खोबरे, आले, लसूण,अख्खा गरम मसाला तेलावर छान भाजून घ्या.

३. ब्लेंडरमधे हा भाजलेला मसाला, लाल मिरची, तमालपत्र आणि थोडं पाणी घालून छान बारीक वाटून घ्यावे.

४. कढईत तेल गरम करून त्यात लाल तिखट, टोमॅटो छान परतून घ्या. नंतर त्यात वाटलेला मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात काळा मसाला घालून परतून घ्या.

५. नंतर त्यात शिजवलेली मटकी,वाटाणा पाण्यातसकट,मीठ घालून चांगले मिक्स करा‌.गरज वाटल्यास पाणी घाला‌‌.१५ मि.हा भाजी मध्यम छान शिजू द्यावे.

हेही वाचा >> गावरान चमचमीत भरलेली ढोबळी मिरची; ऑफिसच्या डब्यासाठी परफेक्ट रेसिपी लगेच नोट करा

६. अशाप्रकारे आपली झणझणीत रस्सा भाजी तयार आहे.

Story img Loader