महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. तोच न्याय खाद्यसंस्कृतीलाही लागू होतो. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण. मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, लोणची, पापड, भजे, बोन्डे यांचे अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात. चला तर मग आज बनवुया खानदेशी पद्धतीचे उकळीचे पिठले

खानदेशी उकळीचे पिठले साहित्य

१ वाटी डाळीचे पीठ
१/२ वाटि दही
२ वाटि पाणी
१ टेबलस्पुन हिरवी मिरची लसूण पेस्ट
१ बारीक चिरलेला कांदा
१ टीस्पून कसुरी मेथी
१ टेबलस्पुन तेल
१ टीस्पून टिस्पून जीरे मोहरी
१/२ टीस्पून हळद
१/४ टीस्पून हिंग

खानदेशी उकळीचे पिठले कृती

१. सर्व प्रथम एका भांड्यात दहीपाणी एकत्र मिक्स करून घ्यावं.त्यात हळद व मीठ घालून मिक्स करून घ्यावे.

२. एका कढईत तेल तापवून घेऊन त्यात मोहरी, जीरे, हिंग, हळद, चिरलेला कांदा, मिरची लसूण पेस्ट घालून परतावे.

३. कांदा लालसर परतून झाल्यावर त्यात दही व पाण्याचे मिश्रण घालून उकळी येऊ द्यावी. उकळी आली की त्यात हळूहळू डाळीचे पीठ टाकून सतत हलवत रहा.

हेही वाचा >> कडू कारले तुफान आवडेल, करा कारल्याची झटपट चटणी! नक्की ट्राय करा

४. पीठ घालून सारखे हलवत रहा नाहीतर पीठाच्या गाठी तयार होतात.छान उकळी आली की त्यात कोथिंबीर घालून भाकरीबरोबर सर्व्ह करा.