नावडत्या भाज्यांमधील हमखास न आवडणारी भाजी म्हणजेच “गवार”.. पण ह्याच नावडत्या भाजी मध्ये थोडासा बदल करून घरातील लोकांना खाऊ घातली तर नक्कीच आवडीने खातील…जेव्हा येतो भाजी बनवायचा कंटाळा, नकोसे वाटते वांग,बटाटा,काकडी अन मुळा..खावंसं वाटत काही झटकन होणारे आणि हलकं फुलकं, तेव्हा जरूर बनवून पहा “खानदेशी पद्धतीने करा गवारीची मसालेदार लहसुणी रस्सा भाजी ”..चला तर पाहुयात, भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा खानदेशी पद्धतीने करा गवारीची मसालेदार लहसुणी रस्सा भाजी
लहसुणी गवार शेंग साहित्य
- १/२ किलो गवार
- लहसुन पाकळया
- जीरा
- १ टिस्पून तिखट
- १/२ टीस्पून हळद
- १ टिस्पून धनेपुड
- चिमूटभर हिंग
- चवीनुसार मीठ
- कोथिंबिर बारीक चिरून
- २ टिस्पून तेल
- १ टीस्पून साखर
- २ टीस्पून आले-लसूण पेस्ट
लहसुणी गवार शेंग कृती
स्टेप १
सर्वप्रथम शेंगा स्वच्छ धुऊन घेऊ त्यानंतर तेलात तळून घेऊन आता एका कढईमध्ये भरपूर लसणाचे पाकळ्या जीरा आणि हिंग घालून फोडणी देऊ आणि झाकून गॅसवर शिजू देऊ.
स्टेप २
आता आला लसूण पेस्ट घालून पुन्हा पाच मिनिटं शिजू देऊ त्यानंतर सगळे मसाले घालून परतून घेऊ आणि झाकून दहा पाच मिनिटं होऊ देऊ.
स्टेप ३
आता अर्धा ग्लास पाणी घालून ठेव आणि एक चम्मच साखर घालून दहा मिनिटे झाकून शिजवून ठेव कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेऊ.
हेही वाचा >> मिक्स डाळवड्याची भाजी; भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवी ही रेसिपी
स्टेप ४
लहसुनी गावाराच्या शेंगाची भाजी तयार आहे.