महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. तोच न्याय खाद्यसंस्कृतीलाही लागू होतो. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण. मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, लोणची, पापड, भजे, बोन्डे यांचे अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात. चला तर मग आज बनवुया खानदेशी रस्सा भाजी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्सा भाजी बनवणे अतिशय सोपे असून त्यासाठी कोणत्याही तयारीची गरज नाही उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमधून भन्नाट शेवभाजी बनवणे शक्य आहे. चला तर जाणून घेऊया अशा चटकदार रस्सा भाजी रेसिपी.

खान्देशी रस्सा भाजी साहित्य

  • १ कप मोड आलेली मटकी
  • १/२ कप मटार
  • १ कांदा उभा चिरून
  • १/४ कप सुके खोबरे
  • १ टेबलस्पून धणे
  • १ दालचिनी तुकडा
  • ५ काळिमिरी
  • ५ लवंगा
  • १ टीस्पून बडीशेप
  • १ टीस्पून शहाजीरे
  • १/२ जायपत्री
  • १ चक्रफूल
  • १ तमालपत्र
  • १ टेबलस्पून लाल सुकी मिरची
  • १ टीस्पून हळद
  • आलं‌ लसूण
  • तेल
  • मीठ चवीनुसार
  • १ टीस्पून तिखट आवडीनुसार
  • कोथिंबीर
  • १ टोमॅटो चिरलेला

खान्देशी रस्सा भाजी कृती

स्टेप १
मटकी,मटार स्वच्छ धूऊन घ्या. पॅनमधे थोडं तेल, हळद, कोथिंबीर, मटकी, वाटाणा, पाणी घालून १० मिनिटं शिजू द्या.

स्टेप २
पॅनमधे कांदा, खोबरे, आले, लसूण, अख्खा गरम मसाला तेलावर छान भाजून घ्या.

स्टेप ३
ब्लेंडरमधे हा भाजलेला मसाला, लाल मिरची, तमालपत्र आणि थोडं पाणी घालून छान बारीक वाटून घ्यावे.

स्टेप ४
कढईत तेल गरम करून त्यात लाल तिखट, टोमॅटो छान परतून घ्या. नंतर त्यात वाटलेला मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात काळा मसाला घालून परतून घ्या.

हेही वाचा >> ढाबा स्टाईल मशरूम मसाला करी; सोप्या पद्धतीने घरीच बनवा टेस्टी रेसिपी

स्टेप ५
नंतर त्यात शिजवलेली मटकी, वाटाणे, मीठ घालून चांगले मिक्स करा‌. गरज वाटल्यास पाणी घाला‌‌. भाजी मध्यम आचेवर छान शिजू द्यावी.

स्टेप ६
आपली झणझणीत रस्सा भाजी तयार आहे..

जेवणात त्याच त्यात भाज्या खाऊन कंटाळा आला की एखादा पारंपारीक पदार्थ खावासा वाटतो. अनेक ग्रामीण भागात पाहुण्याच्या ताटात रस्सा भाजी आवर्जून वाढली जाते. 

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khandeshi recipes in marathi matki vatana rassa bhaji recipe in marathi khandeshi special recipes srk
Show comments