जेव्हा येतो भाजी बनवायचा कंटाळा, नकोसे वाटते वांग,बटाटा,काकडी अन मुळा..खावंसं वाटत काही झटकन होणारे आणि हलकं फुलकं, तेव्हा जरूर बनवून पहा “खानदेशी पद्धतीने करा गिलक्याचे भरीत”..चला तर पाहुयात, भाजी बनवायचा कंटाळा आला तर १० मिनिटांत बनवा खानदेशी पद्धतीने करा गिलक्याचे भरीत..
गिलक्याचे भरीत साहित्य
४ मध्यम आकाराची ताजी तजेलदार थोडे जाडसर गिलके
१ मध्यम बटाटा
२ कांदे बारीक चिरून
१ गड्डा लसूण सोलून पाकळ्या
५-६ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
२-३ टेबलस्पून दाण्याचे कूट
१.५ टीस्पून मीठ
१/२ वाटी तेल फोडणीसाठी व मोहरी,हिंग
७-८ लसूणपाकळ्या बारीक चिरुन फोडणीसाठी
१/४ वाटी कोथिंबीर सजावटीसाठी
१ टीस्पून तिखट
१/४ कप दही
गिलक्याचे भरीत कृती
१. सर्व साहित्याची तयारी करुन घ्यावी.घोसाळी/गिलके व बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करुन कुकरमध्ये थोडे पाणी घालून शिजवून घ्यावे.पाणी कमीच घालायचे आहे.घोसाळ्यांना पाणी सुटते व त्यातच बटाटेही मऊ शिजतात.
२. बटट्याच्या फोडी बाजूला काढून कुस्करून घ्याव्यात.आता चॉपरमध्ये किंवा मिक्सरमध्ये घोसाळ्याच्या फोडी घालाव्यात. याची साल चरचरीत असते.ती ललकर बारीक होत नाही म्हणून चॉपरच्या सहाय्याने बारीक करावे.
३. छोट्या कढईत १/२ चमचा तेल घालून लसूण व मिरची तुकडे थोडे काळपट होईपर्यंत परतावे.त्यानंतर थोड्याशा मीठाबरोबर दगडी खलबत्त्यात वाटून घ्यावे.
४. बटाटे,घोसाळी,कांदा,दाण्याचे कूट,मीठ,तिखट घालून वरुन तेल,मोहरी,हिंगाची फोडणी करावी.त्यावर वाटलेली मिरची लसूण घालावी.वरुन दही घालावे.
हेही वाचा >> १० मिनिटांत बनवा झणझणीत खानदेशी स्टाईल ‘रसीली आलू गोभी’; नोट करा सोपी रेसिपी
५. सर्व भरताचे मिश्रण एकजीव करावे.आता लसणाच्या तिखटाची फोडणी घालून कोथिंबीरीने सजवावे.भाकरीबरोबर मस्त चमचमीत लागते.