सतत त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. अशावेळी रोज वेगळं आणि तरीही चविष्ट काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडतो. विकेंडला तर काहीतरी वेगळं आणि चमचमीत हवं असतं. अशातच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अस्सल खान्देशी ठसकेबाज चटकदार झणझणीत हिरव्या वाटणातील मसाला वांगी, चला तर पाहुयात याची सोपी मराठी रेसिपी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी साहित्य :

  • ४ वांगी
  • १ कांदा मध्यम
  • १ टमाटा लहान
  • १+१/२ टेबल स्पून शेंगदाणे
  • १०-१२ पाकळ्या लसूण
  • २ टेबलस्पून कोथिंबीर चीरलेली
  • ४ हिरव्या मिरच्या
  • ३/४ इंच आलं
  • १/२ टिस्पून धणे पावडर
  • १/२ टिस्पून गरम मसाला/ (छोले मसाला)
  • मीठ चवीनुसार
  • २ टेबलस्पून तेल

हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी कृती

स्टेप १

प्रथम वांगी स्वच्छ धुऊन त्याचे मागील देठ काढणे व त्याच्या लांब फोडी केल्या. तसेच कांदा, टमाटा ही चिरून घेतला.

स्टेप २

हिरवे वाटण तयार करण्यासाठी कोथिंबीर, लसूण, हिरव्या मिरच्या, आलं, शेंगदाणे हे सर्व मिक्सर जार मध्ये घालून गरजेपुरतं पाणी घालून वाटून घेतले.

स्टेप ३

आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात वांग्याच्या फोडी घातल्या व परतले मग हळद व मीठ घालून परतून थोडी वाफ आणली आणि त्या काढून घेतल्या.

स्टेप ४

आता परत गॅसवर कढईमध्ये तेल घेऊन त्यात जिरे, हिंग, हळद घातली व कांदा घालून परतून घेतले. नंतर हिरवे वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतलेपरतले. मग त्यात धने पावडर, मीठ, गरम मसाला घातला या ऐवजी आपण छोले मसालाही घालू शकतो त्याने एक वेगळी चव येते.

स्टेप ५

नंतर त्यात टोमॅटो घालून थोडे परतल्यावर अर्धवट वाफवलेल्या वांग्याच्या फोडी घातल्या व सर्व मिक्स करून थोडेसे पाणी घालून त्याला चांगली वाफ आणली.

हेही वाचा >> नवरात्रीच्या उपवासाला बनवा झटपट आणि पौष्टिक “रताळ्याचे कटलेट”; पटकन नोट करा रेसिपी

स्टेप ६

तयार झालेली भाजी बाऊलमध्ये काढून वरून थोडी कोथिंबीर घातली. हि एक वेगळ्या चवीची भाजी चवीला खुप छान लागते.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khandeshi style hirvya vatnachi vangyachi bhaji recipe in marathi spicy mashed brinjal recipe srk