आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे खास करुन महाराष्ट्रीयन कुटुंबांमध्ये जेवणात तोंडी लावणे हा महत्त्वाचा प्रकार. आपल्याकडे ताट वाढताना उजव्या बाजूला जितके महत्त्व असते तितकेच किंबहुना त्याहून थोडे जास्तच डाव्या बाजूला असते. वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी, चटणी, लोणचं, पापड, भजी असं काही ना काही या बाजूला असतंच. महाराष्ट्रात साधारणपणे नेहमीच्या जेवणात आपण दाण्याची, लसणाची, तिळाची, खोबऱ्याची, जवसाची, मिरचीचा खर्डा असे चटण्यांचे वेगवेगळे प्रकार करतो. आज आपण करुयात खानदेशी मीरची भाजी

खानदेशी मीरची भाजी

१ कप तुर डाळ
१/४ कप शेंगदाणे,
१/४ खोबर्याचे काप
१ कप चीरलेला पालक
१/२ कप आंबट चुका
७-८ हि. मीरच्या
१ टेबलस्पून मेथी
१/२ टेबलस्पून मोहरी
१ टेबलस्पून जीरे
१ कप चीरलेला कांदा
१ टेबलस्पून आलं लसुन पेस्ट
१/४ कप तेल चवी पुरते मीठ
८-१० कडीपत्ता
१/२ टेबलस्पून हिंग
१/२ टेबलस्पून काळा मसाला
१/२ टेबलस्पून हळद

खानदेशी मीरची भाजी

सर्वप्रथम तुर डाळ धुवून ठेवा. त्यानंतर कुकरमध्ये तेल मोहरी घालुन फोडणी करा. हिंग जीरे व कडीपत्ता घाला.

नंतर त्यामध्ये कांदा शेंगदाणे खोबऱ्याचे काप आणि भाज्या घाला.

नंतर सर्व मसाले घाला व ८ कप पाणी घाला वरुन चवीनुसार मीठ घाला व कुकरला ३ शीट्टया करुन घ्या.

हेही वाचा >> पौष्टीक हरियाली पुरी; एकदा खाल तर खातच रहाल अशी सोपी मराठी रेसिपी

कुकर थंड झाल्यानंतर सर्व्हींग बाउलमधे काढून वर फोडणी किंवा तेल घालुन सर्व्ह करा. अशाप्रकारे तयार आहे मीरची भाजी.

Story img Loader