khandeshi style Takachi Kadhi: उन्हाळा असो वा हिवाळा गरमागरम ताकाची कढी म्हणजे मनाला आणि पोटाला मिळणारा वेगळाच आनंद. ताकाच्या कढीमध्ये तुम्ही मुळा, अननस याचाही वापर करू शकता. पण पटकन बनणारी कढी आणि त्याचा गरमागरम घेता येणारा स्वाद यासारखं स्वर्गसुख नाही. चला तर मग पाहुयात चटपटीत खानदेशी कढी कशी बनवायची याची सोपी पद्धत..

चटपटीत खानदेशी कढी साहित्य :

Crispy Butterfly Samosa Recipe
‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
yuva sena protests after attempt to remove place of worship for liquor shop
मद्य दुकानासाठी प्रार्थनास्थळ हटविण्याचा प्रयत्न, युवासेनेची निदर्शने
Announcements of organic natural farming Know how much the use of urea and other fertilizers has increased Mumbai news
सेंद्रीय, नैसर्गिक शेतीच्या फक्त घोषणाच; जाणून घ्या, युरियासह अन्य खतांचा वापर किती वाढला
Grape
राज्यात ५० हजार एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड ? जाणून घ्या, नोटबंदी, कोरोना टाळेबंदी, नैसर्गिक आपत्तींचा परिणाम
How To Make Methi Paratha
Methi Paratha Recipe : मेथीचे बनवा मऊसूत पराठे! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी बेस्ट रेसिपी
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
  • अर्धा लिटर ताक
  • २,३ चमचे बेसन
  • ३,४ हिरव्या मिरचीचे तुकडे
  • ७,८ कढीपत्याची पाने
  • अर्धा चमचा मोहरी
  • अर्धा चमचा जिरे
  • अर्धा चमचा हिंग
  • पाव चमचा हळद
  • कोथिंबीर
  • आल्याचे तुकडे
  • ठेचलेली लसूण
  • तेल
  • थोडीशी साखर (चिमूटभर)
  • चवीनुसार मीठ

चटपटीत खानदेशी कढी कृती :

  • सर्वप्रथम ताकासाठी थोडं आंबट दही घ्या आणि ते रवीने व्यवस्थित घुसळून घ्या.
  • त्यानंतर ताकामध्ये बेसन, साखर, मीठ, आल्याचे तुकडे आणि लसूण ठेचून, मीठ हे सर्व त्यामध्ये मिक्स करा.
  • बेसन मिक्स केल्यानंतर त्याच्या गुठळ्या राहू देऊ नका.
  • दुसऱ्या बाजूला कढई तापत ठेवा आणि त्यात तेल घाला.
  • तेल तापल्यावर त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, मिरचीचे तुकडे, कडिपत्ता घाला आणि वरून तयार केलेले ताक फोडणीला द्या.

हेही वाचा >> नवरात्री उपवास स्पेशल कुरकुरीत बटाटा ट्रँगल्स; पटकन नोट करा रेसिपी

  • त्यानंतर कढीला उकळी येऊ द्या. वरून कोथिंबीर घाला आणि मिक्स करून मस्तपैकी गरमागरम सर्व्ह करा

Story img Loader