khandeshi style Takachi Kadhi: उन्हाळा असो वा हिवाळा गरमागरम ताकाची कढी म्हणजे मनाला आणि पोटाला मिळणारा वेगळाच आनंद. ताकाच्या कढीमध्ये तुम्ही मुळा, अननस याचाही वापर करू शकता. पण पटकन बनणारी कढी आणि त्याचा गरमागरम घेता येणारा स्वाद यासारखं स्वर्गसुख नाही. चला तर मग पाहुयात चटपटीत खानदेशी कढी कशी बनवायची याची सोपी पद्धत..
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
चटपटीत खानदेशी कढी साहित्य :
- अर्धा लिटर ताक
- २,३ चमचे बेसन
- ३,४ हिरव्या मिरचीचे तुकडे
- ७,८ कढीपत्याची पाने
- अर्धा चमचा मोहरी
- अर्धा चमचा जिरे
- अर्धा चमचा हिंग
- पाव चमचा हळद
- कोथिंबीर
- आल्याचे तुकडे
- ठेचलेली लसूण
- तेल
- थोडीशी साखर (चिमूटभर)
- चवीनुसार मीठ
चटपटीत खानदेशी कढी कृती :
- सर्वप्रथम ताकासाठी थोडं आंबट दही घ्या आणि ते रवीने व्यवस्थित घुसळून घ्या.
- त्यानंतर ताकामध्ये बेसन, साखर, मीठ, आल्याचे तुकडे आणि लसूण ठेचून, मीठ हे सर्व त्यामध्ये मिक्स करा.
- बेसन मिक्स केल्यानंतर त्याच्या गुठळ्या राहू देऊ नका.
- दुसऱ्या बाजूला कढई तापत ठेवा आणि त्यात तेल घाला.
- तेल तापल्यावर त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, मिरचीचे तुकडे, कडिपत्ता घाला आणि वरून तयार केलेले ताक फोडणीला द्या.
हेही वाचा >> नवरात्री उपवास स्पेशल कुरकुरीत बटाटा ट्रँगल्स; पटकन नोट करा रेसिपी
- त्यानंतर कढीला उकळी येऊ द्या. वरून कोथिंबीर घाला आणि मिक्स करून मस्तपैकी गरमागरम सर्व्ह करा
First published on: 21-10-2023 at 14:03 IST
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khandeshi style takachi kadhi recipe in marathi khandeshi recipe in marathi srk