खानदेशामध्ये भौगोलिक परिस्थितीला अनुसरून डाळींचे पिक हे जास्त प्रमाणावर येते किंवा घेतले जाते. या डाळींपैकीच एक महत्त्वाची डाळ म्हणजे उडीद डाळ किंवा काळे उडीद ..याचं भरपूर प्रमाणावर खानदेशामध्ये पीक घेतलं जातं..आपल्याला उडदाच्या डाळीचा मेदू वडा फक्त माहित आहे जो साउथला बनवला जातो. परंतु खानदेशामध्ये देखील या उडदाच्या डाळीपासून बडीशेप जीरे वाटून घातलेले उडदाच्या डाळीचे चमचमीत वडे हा देखील एक अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे .चला तर मग खानदेशातील फार जुना म्हणजे चौदाशे वर्षांपूर्वीचा अस्तित्वात आलेला खानदेशी उडीद वडा रेसिपी पाहुयात..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खानदेशी उडीद वडे साहित्य –

  • १ कप उडीद डाळ
  • १ टीस्पून जीरे
  • १ टीस्पून बडीशोप
  • ७-८ हिरव्या मिरच्या
  • १ इंच आले
  • १ टीस्पून तिखट
  • १/२ टीस्पून हळद
  • चिमूटभर हिंग
  • कोथिंबीर बारीक चिरलेली
  • मीठ चवी नुसार

खानदेशी उडीद वडे कृती –

स्टेप १
प्रथम सर्व साहित्य एका ठिकाणी घ्या. नंतर उडीद डाळ स्वच्छ धुवून पाण्यात ६-७ तास भिजवून घ्यावी. मग त्यातलं पाणी चाळणीत काढून निथळून घ्या, मग मिक्सरच्या भांड्यात पाणी न घालता बारीक वाटून घ्या.

स्टेप २
नंतर मिक्सरच्या भांड्यात आलं, मिरची, जीरे, बडीशोप वाटून घ्यावी.

स्टेप ३
आता वाटलेल्या पिठात बारीक केलेला मसाला घालून, तिखट, हळद, मीठ, हिंग, कोथिंबीर घालून पीठ छान फेटून घ्या..

स्टेप ४
नंतर ताटाला प्लास्टिकची पिशवी लावून त्यावर तयार पिठाचा गोळा घेऊन पाण्याचा हात लावून वडे थापून घ्यावेत.

स्टेप ५
आता गरम तेलात अलगद वडे सोडून दोन्ही बाजूने तळून घ्यावेत.

हेही वाचा >> लय अवघड हाय गड्या उमगाया बाप रं! शेतकरी वडिलांना मुलानं गिफ्ट केला स्मार्ट फोन, VIDEO पाहून डोळे पाणावतील

स्टेप ६
तयार झाले आपले खानदेशी स्पेशल उडदाचे वडे. हे उडदाचे वडे दही, गव्हाची खीर याबरोबर सर्व्ह करा..

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khandeshi udid wade recipe in marathi khandeshi recipes in marathi srk